एक्स्प्लोर

PM Modi : लोकसभा निवडणुकीआधी मोदींचा कानमंत्र, भाजप नेत्यांची कानउघाडणीही; म्हणाले...

PM Modi Advice To BJP Leaders : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे.

PM Modi Advice To BJP Leaders : पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या (BJP Meet) बैठकीत भाजप कार्यकर्त्यांना (BJP Leaders) कानमंत्र दिला आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना सतर्कही केलंय, काहींची कानउघाडणीही केली आहे. लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) आता 400 पेक्षा कमी दिवस उरले आहेत. भाजपने कुठलाही फाजील आत्मविश्वास न दाखवता निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचा, मताची अपेक्षा न करता अल्पसंख्यांकानाही जवळ करा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीचा समारोप मंगळवारी (17 जानेवारी) पंतप्रधानांच्या भाषणाने झाला.

जे. पी. नड्डांचा कार्यकाळ वाढवला

भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक वर्षातून एकदा होत असते. पण या बैठकीचं महत्व अधिक आहे कारण, लोकसभा निवडणुकांआधीची ही कार्यकारिणीची बैठक झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान यावेळी काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 

राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदींचा कानमंत्र

  • 18 ते 25 या वर्गाला भारताचा सगळा राजकीय इतिहास माहिती नाही. त्यांना आधीच्या सरकारांच्या भ्रष्टाचाराबद्दल, चुकीच्या धोरणांबद्दल माहिती नाही. त्यांना याची जाणीव करुन द्या, त्या तुलनेत भाजपच्या सुशासनाबाबत अवगत करा
  • समाजाच्या सर्व थरांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. मतांची अपेक्षा न करता अल्पसंख्यांकांपर्यंतही पोहोचा, चर्चलाही भेट द्या
  • अल्पसंख्यांकांबद्दल बोलताना त्यांनी विशेष करुन पसमंदा, बोहरा मुस्लिमांचा उल्लेख केल्याचं काही सूत्रांनी सांगितलं
  • बेटी बचाओ प्रमाणे धरती बचाओ या कार्यक्रमावरही लक्ष देण्याची गरज मोदींनी बोलून दाखवली
  • अमृतकाळाला कर्तव्यकाळात रुपांतरित केलं तरच भारत विकासाच्या मार्गावर पोहोचू शकेल. 

'हर फिल्म पे बोलना जरुरी हैं क्या?'

यासोबतच पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यांनी विनाकारण वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या. 'हर फिल्म पे बोलना जरुरी हैं क्या?' असा सवाल उपस्थित करत मोदींनी भाजप नेत्यांना विनाकारण वाद निर्माण करण्यापासून दूर राहायला सांगितलं. एक नेते आहेत, जे सतत चित्रपटांबद्दल बोलून चर्चेत राहायचा प्रयत्न करतात त्यांना, राष्ट्रीय अध्यक्षांनी पण एकदा समज दिली. पण त्यानंतरही ते थांबत नाहीत. अशा गोष्टींनी आपण नेते बनू असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असं मोदींनी म्हटलं. 

पंतप्रधानांच्या कानउघाडणीनंतर भाजप नेते थांबणार?

पंतप्रधानांच्या कानउघाडणीनंतर तरी आता हे विनाकारणचे वाद थांबणार का पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकांना एक वर्ष उरलं आहे, याच वर्षात 9 राज्यांच्या निवडणुकाही आहेत. जे पी नड्डा यांनी तर एकही निवडणूक गमवायची नाहीय असं लक्ष्य भाजप कार्यकर्त्यांना दिलं आहे. त्यामुळे या कार्यकारिणीतून आणि पंतप्रधानांच्या भाषणातून भाजप नेते किती जोमात सज्ज राहतात हे पाहावं लागेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

JP Nadda Tenure Extended : जे. पी. नड्डांचा कार्यकाळ वाढवला,  जून 2024 पर्यंत नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
Embed widget