PM Modi Biden Meeting : रशिया-युक्रेन युद्ध, श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथ यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची आज भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांमधील ही ऑनलाइन बैठक होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान ही बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील. तसेच दक्षिण आशिया, इंडो-पॅसिफिक आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर घडामोडींवर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी या ऑनलाइन बैठकीबाबत माहिती दिली.
सोमवारी वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेच्या चौथ्या सत्र होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही नेत्यांमधील ही ऑनलाइन बैठक होणार आहे. आज वॉशिंग्टनमध्ये चौथ्या सत्रात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा करतील.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन दक्षिण आशियातील सध्याच्या घडामोडी, इंडो-पॅसिफिक आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील, तसेच बैठकीदरम्यान विद्यमान द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील.' 'ऑनलाइन बैठकीमुळे द्विपक्षीय व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही बाजूंना नियमित आणि उच्च-स्तरीय संपर्क सुरू ठेवता येईल,' असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, वॉशिंग्टनमधून मिळालेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अर्थव्यवस्था आणि भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी सोमवारी पंतप्रधान मोदींसोबत ऑनलाइन बैठक घेणार आहेत."
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Petrol-Diesle Price : देशात इंधन दरवाढीचा भडका! आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्या शहरांतील दर काय?
- Pakistan : आज शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होणार, शपथविधी आधी कोर्टात हजेरी?
- Imran Khan : सत्तेच्या 'पीच'वर कसे बाद झाले इम्रान खान; असा झाला 'पव्हेलियन'मध्ये पोहोचण्यापर्यंतचा प्रवास
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha