एक्स्प्लोर

अंधश्रद्धेला फाटा देत योगी आदित्यनाथ नोयडात दाखल, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

अंधश्रद्धेला फाटा देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नोयडाला भेट दिली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं.

नवी दिल्ली : अंधश्रद्धेला फाटा देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नोयडाला भेट दिली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थीतीत दिल्लीतील कालकाजी ते नोयडाच्या बॉटेनिकल गार्डनपर्यंतच्या नव्या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं. या नव्या मेट्रो सेवेचं नाव मॅझेंटा लाईन आहे. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मुक्तकंठाने कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश सरकार विकासाची कामं अतिशय जलद गतीनं करत आहे. त्यांच्या पेहराव्यावरुन अनेकवेळा भ्रम पसरवला जातो की, ते अतिशय रुढवादी, परंपरावादी आहेत. पण मला आनंद वाटतो की, ज्या नोयडात येण्याची हिम्मत यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. त्याच नोयडात येऊन योगी आदित्यनाथ यांनी सर्व अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे." जे मुख्यमंत्री नोयडाला भेट देतात, त्यांचं पद जातं, अशी अंधश्रद्धा उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहे. यापूर्वी ज्या मुख्यमंत्र्यांनी नोयडाला भेट दिली होती, त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. यापूर्वी समाजवादी सरकारच्या कार्यकाळातही तत्कालिन मुख्यमंत्री आखिलेश यादव यांनी नोयडाचा दौरा नेहमी टाळला होता. तर मुलायम सिंह, कल्याण सिंह, राजनाथ सिंह यांना नोयडा दौऱ्यानंतर पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. 1988 मध्ये काँग्रेसचे वीर बहादुर सिंह यांनी आपला नोयडाचा दौरा अटोपून राजधानी लखनऊमध्ये परतल्यावर, त्यांना आपली खुर्ची सोडावी लागली होती. तर 1989 मध्ये काँग्रेसचे आणखी एक नेते एन.डी. तिवारी यांनाही खुर्ची सोडावी लागली. 1999 मध्ये कल्याण सिंह यांनाही नोयडा दौरा भोवला होता. 1995 मध्ये मुलायम सिंह यांनीही नोयडा दौरा केल्यानंतर, त्यांना सत्ता गमवावी लागली. तर 2012 मध्ये बसपा सुप्रीमो मायावती यांनी नोयडाचा दौरा केल्यानंतर, सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यानिमित्त सुरुवातीपासून प्रश्न उपस्थित केले जात होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget