Platform Tickets Rules : रेल्वेमधून प्रवासासाठी साधारणतः एक ते दोन महिन्यांपूर्वीच बुकिंग करावी लागते. रिझर्वेशनसाठी दोन प्रकारचे तिकिट बुकिंग असतात. तिकिट रिझर्वेशन विंडो किंवा ऑनलाईन माध्यमातून तिकिट बुक करता येतं. पण, जर तुम्हाला अचानक एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी प्रवेश करावा लागला तर? त्यामुळे अशावेळी तत्काळ तिकिट हाच एकमेव उपाय समजला जातो. अशातच अनेकांना माहीत नाही की, प्लॅटफॉर्म तिकिट असल्यावरही प्रवासी ट्रेनमधून प्रवास करु शकतात. असं करणं बेकायदेशीर नसून कायदेशीर आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटावर कसा कराल प्रवास?
जर तुम्हाला अचानक कुठेतरी जावं लागणार असेल आणि जर तुम्ही केवळ प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन ट्रेनमध्ये चढला असाल तर तुम्ही टीसीकडे जाऊन अगदी सहजर तिकिट मिळवू शकता. हा भारतीय रेल्वेचाच एक नियम आहे. जर एखादी व्यक्ती प्लॅटफॉर्म तिकिटासोबत ट्रेनमध्ये चढली असेल, तर अशा व्यक्तीनं तत्काळ टीसीशी संपर्क साधून तिकिट घ्यावं लागेल.
प्रवास करण्याआधी हे नियम लक्षात घ्या
कधीकधी तिकिट फुल झाल्यामुळे आपल्याला रिझर्वेशन मिळत नाही. पण तरिही तुम्हाला प्रवास करण्याची मुभा दिली जाते. जर तुमच्याकडे बुकिंग तिकीटही नसेल तर तुम्हाला ज्या स्थानकावर जायचं आहे, त्या स्थानकापर्यंतच्या तिकिटाच्या किंमतीसोबत अधिक 250 रुपये दंड आकारण्यात येतो. हे भारतीय रेल्वेच्या महत्वाच्या नियमांपैकी एक आहेत, जे तुम्हाला प्रवास करण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान माहीत असलेच पाहिजे.
प्लॅटफॉर्म तिकिट ज्या स्थानकापासून आहे, तिथपासून आकारलं जाईल भाडं
प्लॅटफॉर्म तिकिट प्रवाशाला ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देतं. प्लॅटफॉर्म तिकिटाचा फायदा म्हणजे, प्रवाशाला त्या स्टेशनपासून भाडं द्यावं लागेल, जिथून त्यानं प्लॅटफॉर्म तिकिट घेतलं आहे. तसेच तिकिटाचं भाडं वसूल करताना तेच स्टेशन वैध असेल. ज्या वर्गातून प्रवासी प्रवास करत आहे, त्या प्रवाशाकडून त्याच क्लासचं भाडं आकारलं जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :