मुंबई : महाराष्ट्राप्रमाणे देशभरातील सिंगल युज ऑफ प्लॅस्टिकच्या वापराबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार देशभरातील प्लॅस्टिक प्लेट्स, कप, मिठाईचे डबे, सिगारेटच्या पाकिटावर चढविण्यात येणारे प्लॅस्टिक आणि तत्सम इतर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 


देशभरात येत्या 1 जुलैपासून  देशभरात प्लॅस्टिक प्लेट्स, कप, मिठाईचे डबे, सिगारेटच्या पाकिटावर चढविण्यात येणारे प्लॅस्टिक आणि तत्सम इतर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना शुक्रवारी जाहीर केली. या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करताना कंपोस्टेबल प्लॅस्टिकचा वापर करण्याची मुभा यावेळी देण्यात आली आहे.या निर्णयामुळे प्लास्टिक व्यवसायिक यांना मोठा फटका बसणार आहे.


महाराष्ट्रात मार्च  2018 मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. तोच आत देशभरात लागू करण्यात आला आहे .
 या निर्णयानुसार सिंगल युज ऑफ प्लॅस्टिकच्या वापरास, उत्पादन करण्यास, आयात, साठा करणे आणि विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.त्यामुळे देशभरातील चहाच्या टपरीवर आता प्लॅस्टिकऐवजी कागदी कप पहायला मिळतात


कोणकोणत्या वस्तूंवर येणार बंदी?


प्लॅस्टिकचे कप, ग्लास, सिगारेटच्या पाकिटावर असणारे प्लॅस्टिकचे अनावरण, प्लॅस्टिकचे चमचे, केक कापण्यासाठी देण्यात येणारी प्लॅस्टिकची सुरी, चॉकलेट आणि आईस्क्रिमसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या काड्या, सजावटीसाठी कापण्यात येणारे पॉलिस्ट्रीन, फुग्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या दांडया, प्लॅस्टिकचे मिठाईचे डबे यांसह इतर वस्तूंचा समावेश आहे.


या निर्णयात प्लॅस्टिकच्या पिशव्यांची जाडी वाढवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 30 सप्टेंबरपासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांची जाडी 50 मायक्रॉनहून वाढवून 75 मायक्रॉनपर्यंत ठेवली आहे. तर त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत ही जाडी 120 मायक्रॉनपर्यंत असणार आहे.या निर्णयामुळे पर्यावरणाला फायदा निश्चित होईल.


संबंधित बातम्या :