एक्स्प्लोर
प्रार्थना म्हणताना खिशात पराठा, चिमुरड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
नवी दिल्ली: सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वांचेच जीवन गतिमान झालं आहे. त्यातच आजच्या डिजिटल युगात मुलांचे शिक्षणही स्मार्ट व्हावे, यासाठी पालकही तितकेच सतर्क झाले आहेत. पण स्मार्ट शिक्षणाच्या हव्यासापायी चिमुरड्यांचे आयुष्य दप्तराच्या ओझ्याखाली दबून जात आहे. त्यांनाही या फास्ट लाईफच्या स्पर्धेत ओढलं जात आहे. यासंदर्भातीलच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटिझन्सनी आपली रोखठोक मते व्यक्त केली आहेत.
हैदराबादमधील सुरेन नावच्या एका व्यक्तीने आपल्या ट्विटरवरुन एक फोटो शेअर केला असून, या फोटोत शाळेतील प्रार्थनेच्या रांगेत उभ्या असलेल्या मुलाच्या खिशात पराठा दिसत आहे. सुरेनने या फोटोसोबत सर्वांना विचार करायला लावणारं मतही मांडलं आहे. सुरेनने आपल्या पोस्टमध्ये, ''खिशात सकाळचा नाश्ता, अपूरी झोप, शाळेची वेळ 10 पासून ते 5.30 पर्यंत का नाही? याचा विचार करा?'' असं लिहलं आहे. सुरेनच्या या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, सुरेनने हा फोटो पोस्ट करताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनाही टॅग केला आहे.@HRDMinistry @KTRTRS Morning breakfast in the pocket. Sleep.. Incomplete.... School time Y not 10 am to 5.30 pm... PLEASE THINK.... pic.twitter.com/5MVL5zwP3F
— Suren Pantulu (@surenpl) January 19, 2017
I agree completely. That's a picture that just breaks your heart. Children need a childhood & not this sort of a pressure cooker environment https://t.co/UC1hday5ij — KTR (@KTRTRS) January 19, 2017सुरेनच्या या ट्वीटवर तेलंगणाचे मंत्री केटीरामाराव यांचे उत्तरही आले आहे. रामाराव यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ''या फोटोमुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील हे मी समजू शकतो. मुलांना त्यांचे लहानपण मनसोक्त जगू द्यावे, अशाप्रकारच्या प्रेशर कूकरच्या वातावरणात त्यांना जगू देऊ नये,'' असं म्हणलं आहे. दरम्यान, हा फोटो कुठला आहे, याची पुष्टी अजूनही झाली नसून, सुरेनच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोवर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
@KTRTRS U have been advocating for change of school timings. Instead it cud be from 8 am to 1 pm. Children will get enough time for evrythng
— Khaleequr Rahman (@Khaleeqrahman) January 21, 2017
.@KTRTRS @balala_ahmed this is same system we grown but b4 it wasn't like this, commercialisation&exam oriented mindset need to be changed! — Mubashir (@rubusmubu) January 20, 2017
@KTRTRS @surenpl @HRDMinistry leaders with this concept will create history and also rule the country. Great attitude to help kids
— Sairam Dr (@Kvss07) January 20, 2017
@KTRTRS Do you have guts to change the education system in Telangana? Will Telangana stand as a role model to others? — Kiran (@Kiran180882) January 22, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
बातम्या
क्राईम
Advertisement