Yellow Fungus: गाझियाबाद येथील एका कान, नाक आणि घसा रोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या निरिक्षणात पिवळ्या बुरशीजन्य आजाराचा रुग्ण आढळल्याची बाब स्पष्ट केली आहे. आतापर्यंत काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचे रुग्ण समोर आल्यामुळे देशावर आणखी एक संकट ओढावत असल्याची बाब चिंतेत टाकून गेली, त्यातच आता हे पिवळ्या बुरशीचं प्रकरण नव्यानं समोर आल्यामुळे आरोग्य क्षेत्राची डोकेदुखी आणखी वाढणार का, हाच प्रश्न उदभवत आहे.  ही बुरशी काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा अधित धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. 


गाझियाबाद येथील एका कान, नाक आणि घसा रोग तज्ज्ञ बिपीन त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविडमधून सावरलेल्या रुग्णांमध्ये काळा, पांढऱ्या आणि आता पिवळ्या बुरशीचाही संसर्ग पाहायला मिळाला असून, तो अधिक घातक आहे. जिथं पांढरी बुरशी फुफ्फुसांवर मारा करते, तिथेच काळी बुरशी मेंदूवर परिणाम करत आहे. मानवामध्ये आतापर्यंच पिवळ्या बुरशीचे नमुने पाहिले गेले नव्हते, काही प्राण्यांमध्ये ही बुरशी दिसून आली होती. पण, माणसामध्ये यापूर्वी मात्र असं प्रकरण आढळलं नाही, असं निरिक्षण डॉ, त्यागी यांनी नोंदवलं आहे. 


भारतामध्ये 500 बिलियन डॉलर गुंतवणूक करायची इच्छा असल्याचं थेट पंतप्रधानांनाच आवाहन; इंग्रजी वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे सारा देश बुचकळ्यात 


डॉ. त्यागी यांच्या माहितीनुसार ज्या व्यक्तिमध्ये पिवशी बुरशी आढळली आहे, त्या व्यक्तीला मागील दोन महिन्यांपासून कोविडचा संसर्ग झाला आहे. यातून ते सावरत असतानाच एकाएकी त्यांच्या नाक आणि डोळ्यांतून अचानकच रक्त येण्यास सुरुवात झाली. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं. 


पिवळ्या बुरशीची कारणं 


स्वच्छतेचा अभाव हे पिवळ्या बुरशीचं मुख्य कारण असल्याची माहिती डीएनएनं प्रसिद्ध केली आहे. अनेक दिवसांपासूनचे खाद्यपदार्थ घरात टीकू न देण्याचा सल्लाही या पार्श्वभूमीवर देण्यात येत आहे. घरात असणाऱा दमटपणाही बुरशीजन्य घटकांच्या वाढीस कारणीभूत ठरतो, त्यामुळे घरात दमट वातावरण टाळा.