मुंबई : अमेरिकेतील थिंक टँक असलेल्या प्यू रिसर्स सेंटरने भारतातील धर्म आणि लोकांची मानसिकता यावर एक सर्व्हे केला आहे. कोरोना संक्रमणाच्या आधी म्हणजे 2019 सालचा शेवट ते 2020 सालच्या सुरुवातीच्या काळापर्यंत केलेल्या या सर्व्हेमध्ये जवळपास 29,999 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 64 टक्के हिंदूंना वाटतंय की सच्चा भारतीय असण्यासाठी हिंदूच असणं गरजेचं आहे तसेच 80 टक्के लोकांना वाटतंय की हिंदी भाषेचा वापर करणे म्हणजे खरे भारतीय असल्याची ओळख आहे.
भारतात जगातील सर्वाधिक धार्मिक विविधता आढळते. जगातील सर्वाधिक हिंदू, जैन आणि शिख धर्मिय लोक भारतात राहतात तर मुस्लिम लोकसंख्येमध्ये भारताचा जगातील टॉपच्या देशात समावेश होतो. तसेच ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचेही लाखो लोक भारतात राहतात. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील थिंक टँक असलेल्या प्यू रिसर्स सेंटरने 17 भाषांतील भाषांतील भारतीयांची धार्मिक मानसिकता काय आहे याचा अभ्यास केला.
या अहवालातून खालील गोष्टी समोर आल्या.
- देशभरातील 84 टक्के लोकांना वाटतंय की ते खरे भारतीय आहेत. या लोकांनी आपल्याला इतर धर्मांबद्दल आदर असल्याची भावना व्यक्त केली. भारतातील सहा प्रमुख धर्मातील लोकांना वाटतंय की ते त्यांच्या धर्माचं पालन मुक्त आणि योग्य वातावरणात करु शकतात.
- या सहाही प्रमुख धर्मातील लोकांना आपल्या धर्मात आणि इतर धर्मात जास्त काही साम्य वाटत नाही. तसेच या लोकांचे बहुतांश खास मित्र हे इतर धर्मातील नसून त्यांच्याच धर्मातील असल्याचं समोर आलं आहे.
- 80 टक्के मुस्लिमानी आंतरधर्मिय विवाहाला विरोध केला तर हिंदूमध्ये ही संख्या 65 टक्के इतकी आहे. या लोकांना आपल्या धर्मातील मुला-मुलींनी इतर धर्मातील लोकांशी लग्न करु नये असं वाटतं.
- हिंदूंना वाटतंय की त्यांचा धर्म आणि त्यांची राष्ट्रीयता ही जवळपास एकच आहे. जवळपास 64 टक्के हिंदूंना वाटतंय की सच्चा भारतीय असण्यासाठी हिंदूच असणं गरजेचं आहे. तसेच 80 टक्के लोकांना वाटतंय की हिंदी भाषेचा वापर करणे म्हणजे खरे भारतीय असल्याची ओळख आहे.
- उत्तर भारतातील 69 टक्के, मध्य भारतातील 83 टक्के आणि दक्षिण भारतातील 42 टक्के लोकांना वाटतंय की त्यांची हिंदू असणं ही ओळख म्हणजे राष्ट्रीयत्व आहे.
- जर एखादा व्यक्ती गायीचं मांस खात असेल तर तो हिंदू असू शकत नाही असं 72 टक्के हिंदूना वाटतंय. 49 टक्के लोकांना वाटतंय की देवावर विश्वास नसेल तर तो व्यक्ती हिंदू असू शकत नाही तर 48 टक्के लोकांना वाटतंय की एखादा व्यक्ती मंदिरात जात नसेल तर तो हिंदू नसतो.
- त्याचप्रमाणे, 77 टक्के मुस्लिमांना वाटतंय की जर एखादा व्यक्ती डुक्कराचं मांस खात असेल तर तो मुस्लिम होऊ शकत नाही. तसेच 60 टक्के मुस्लिमांना वाटतंय की अल्लाहवर विश्वास नसेल तर तो मुस्लिम नसतो आणि 61 टक्के मुस्लिमांना वाटतंय की दर्गा किंव मशिदीत जर कोणी जात नसेल तर तो मुस्लिम नसेल.
- जवळपास 74 टक्के मुस्लिमांना आपल्या स्वत:चे कायदे म्हणजे शरिया कायदा असावा अशी इच्छा आहे.
- दहापैकी सात मुस्लिमांना असं वाटतंय की 1947 साली देशात जी धर्माच्या आधारे फाळणी झाली ती हिंदू-मुस्लिम एकात्मतेसाठी धोकादायक ठरली. तर केवळ 37 टक्के हिंदूंना असं वाटतंय. फाळणी ही हिंदू-मुस्लिम एकात्मसेसाठी धोकादायक असल्याचं मत 66 टक्के शिखांनी मांडलंय.
- धर्माच्या पलिकडे जाऊन भारतात जाती-पातीच्या भिंती आढळतात. अनेकांना, विशेषत: कनिष्ठ जातीतील लोकांना आपल्यावर पिढ्यान-पिढ्या अन्याय झाला असल्याचं वाटतंय. त्यामुळे जातीय आणि आर्थिक भेदभावाला सामोरं जावं लागल्याचंही त्यांनी सांगितलंय.
- जवळपास 70 टक्के लोकांचे खास मित्र हे त्यांच्याच जातीतील असल्याचं दिसून आलंय. 64 टक्के लोकांनी सांगितलंय की त्यांच्या जातीतील महिलांनी इतर जातीतील पुरुषांशी विवाह करु नये.
- बहुतांश भारतीयांना म्हणजे 97 टक्के भारतीयांनी त्यांचा देवावर विश्वास असल्याचं सांगितलंय. 80 टक्के भारतीयांनी सांगितलंय की त्यांना देवाचं अस्तित्व मान्य आहे. फक्त बौध्द धर्मातील एक तृतियांश लोकांनी त्यांचा देवावर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे.
- जवळपास 7 टक्के हिंदू हे मुस्लिमांचा ईद हा सण साजरा करतात तर 17 टक्के हिंदू हे ख्रिसमस सण साजरा करतात.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadi Yatra | आषाढी यात्रेसाठी उद्यापासून पालख्यांचं प्रस्थान; भाजप अजूनही पायी वारीवर ठाम
- Maharashtra Vidhan Sabha: येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला अध्यक्ष मिळणार, काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरु
- Home vaccination Drive : पुण्यातून घरोघरी लसीकरणाची सुरुवात होणार; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती