Petrol-Diesel Price : आज दर वधारले? गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या किमती
Petrol-Diesel Price Today 31 May 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.
Petrol-Diesel Price Today 31 May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज महिन्याच्या शेवटच्य दिवशीही देशात पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नसून दर स्थिर आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या (Diesel Price) किमती स्थिर आहेत.
पेट्रोल पंप चालकांचा इंधन खरेदी न करण्याचा निर्णय
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम आहेत. ब्रेट क्रूडनं प्रति बॅरल 121 डॉलर ओलांडलं आहे. तसेच, पेट्रोलियम डिलर्सनी आज, मंगळवार, 31 मे रोजी 24 राज्यांमधील सुमारे 70,000 पेट्रोल पंपांवर तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार असून पेट्रोल पंप डीलर्स आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही. देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला असून पेट्रोल पंप मात्र सुस्थितीत सुरु राहणार आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याचा फटका वाहनचालकांना तरी बसणार नाही यावरून स्पष्ट होतं.
देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 114.38 रुपये प्रति लिटर आणि आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 100.30 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील महानगरांतील किमती काय?
आज मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?
महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).