Petrol Diesel Price Today : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी आजही इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. याउलट श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड चढउतार झाल्यानंतर गेल्या वर्षी (नोव्हेंबर 2021) दिवाळीपासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये कायम आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटरवर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये तर, डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे.


भारतातही लवकरच होऊ शकते इंधन दरवाढ
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 डॉलर आहे. तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही, मात्र कच्चे तेलाची किंमत प्रति बॅरल 33 डॉलरपेक्षा जास्त महाग झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलचे दर एकत्रितपणे वाढवण्याऐवजी सरकारी तेल कंपन्या दररोज किमतीत किरकोळ वाढ करण्याचा विचार करू शकतात, जेणेकरून जनतेवर वाढलेल्या किमतींचा भार पडणार नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha