Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी; दिलासा की, खिशाला कात्री? झटपट चेक करा
Petrol Diesel Price in Mumbai Today 22 June : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र देशातील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर.
Petrol Diesel Price in Mumbai Today 22 June : सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. अशातच आजही तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. बुधवार, 22 जून रोजी इंधनांच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. साधारणतः एका महिन्यापूर्वी म्हणजेच, 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला होता. यानंतर पेट्रोलच्या कमाल दरांत 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरांत 7 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून तेलाचे दर स्थिर आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?
महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).