Petrol Diesel Price Hike : पाच राज्यातल्या निवडणुकांचा रणसंग्राम संपलाय. साऱ्यांचं लक्ष आता निवडणुकांच्या निकालाकडे आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर नागरिकांनाही धडकी भरली. कोणत्याही क्षणी इंधन दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरवाढीच्या भीतीने मुंबईत पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतायत. निवडणुकांचा निकाल जाहीर होताच केंद्र सरकार ही दरवाढी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काल रात्री पेट्रोल पंपांवर पेट्रोल पंपावर नागरिकांची रांग पाहायला मिळाली. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढलेत. कच्च्या तेलाच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केलीय. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचलीय. त्यामुळे आता पेट्रोल कंपन्यांची भूमिका आणि केंद्र सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 


पेट्रोल डिझेल किती महाग होऊ शकतं? 


कच्च्या तेलाच्या दरात प्रत्येकी एक डॉलरची वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्या साधारणपणे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 40 पैशांपर्यंत वाढवतात. 1 डिसेंबर 2021 रोजी प्रति बॅरल 68 डॉलरच्या निचांकी पातळीला स्पर्श केल्यानंतर, कच्चं तेल आता प्रति बॅरल 139 डॉलर या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. म्हणजेच, गेल्या 97 दिवसांत कच्च्या तेलाची किंमत 69 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांत 5 डॉलरपर्यंत वाढ झाल्यानंतर तेल कंपन्या साधारणपणे पेट्रोल डिझेलच्या दरांत 2 रुपयांपर्यंत वाढ करतात. जर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली, तर त्यामुळे होणारा तोटा भरुन काढण्याचा विचार केला, तर यानुसार सरकारी तेल कंपन्यांना त्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान 25 रुपयांनी वाढ करावी लागेल.


पाहा व्हिडीओ : दरवाढीच्या भीतीने पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा



ब्रेक इव्हनसाठी दरांत 12 रुपयांनी वाढ करावी लागेल


आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं (ICICI Securities)  एका अहवालात म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींसह-ज्यावर देशांतर्गत इंधन किरकोळ किमती जोडल्या जातात. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांना ब्रेक-इव्हन तोटा दूर करण्यासाठी 16 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी प्रति लिटर 12.1 रुपयांच्या दरवाढीची आवश्यकता आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं एका अहवालात म्हटले आहे की तेल कंपन्यांसाठी मार्जिन समाविष्ट केल्यानंतर किंमती 15.1 रुपयांनी वाढवण्याची गरज आहे.


रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia-Ukraine War) जगाची चिंता वाढली आहे. अशातच दोन देशांतील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचली आहे. 2012 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. असं असलं तरी देशात मात्र गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर (Changes in Petrol Diesel Rtae) आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :