Sukanya Samriddhi Yojana (SSY) : सुकन्या समृद्धी योजना, मुलींसाठी सुरू केलेली सरकारची ही योजना आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी उत्तम नियोजन करणं हा आहे. या योजनेत गुंतवणुकीवर चांगल्या परताव्यासह कर सवलती देखील मिळतात. या योजनेत कोण खातं उघडू शकतं आणि या योजनेत किती गुंतवणूक केली जाऊ शकते? जाणून घेऊया सविस्तर... 


या व्यक्ती सुरु करु शकतात अकाउंट 


हे खातं 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावानं सुरु करता येतं. हे खातं मुलीच्या आई-वडिलांच्या किंवा पालकांच्या (Guardian) नावानं सुरु करता येतं. तुम्ही जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावाने SSY Account सुरु करु शकता. दरम्यान, जुळं (Twins) किंवा तिळं ( Triplets) जन्मासारख्या अपवादात्मक परिस्थितीत, दोनपेक्षा जास्त खाती सुरु करता येऊ शकतात. 


खातं उघडण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक 


तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावानं सुकन्या समृद्धी खातं (Sukanya Samriddhi Account) सुरु करायचं असेल, तर त्यासाठी काही कागदपत्रं आवश्यक आहेत. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी, मुलीचं जन्म प्रमाणपत्र आणि आई-वडिलांची KYC कागदपत्रं (PAN, आधार कार्ड) आवश्यक आहेत.


इतके पैसे जमा करावे लागतील


तुम्ही हे खातं फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीनंही सुरु करु शकता. तुम्हाला दरवर्षी किमान 250 रुपये या खात्यात जमा करावे लागतील. जरा काही कारणास्तव तुम्हाला अकाउंटमध्ये पैस भरता आले नाही, तर तुमचं खातं डीफॉल्ट खातं म्हणून घोषित केलं जाईल. तुम्ही एका आर्थिक वर्षात एका खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास त्या व्यक्तीला अतिरिक्त रकमेवर कोणत्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतात.


सुकन्या समृद्धी योजनेवर (Sukanya Samriddhi Yojana) परतावा  किती?


सरकार प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीपूर्वी Sukanya Samriddhi Yojana सह सर्व लहान बचत योजनांसाठी (Small Saving Schemes) व्याजदर जाहीर करते. सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर (Interest Rate on Sukanya Samriddhi Yojana) 7.6 टक्के आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sukanya Samriddhi yojana : सुकन्या समृद्धी योजनेत झाले 'हे' मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha