Coronavirus Update : देशातील कोरोनाचा संसर्ग घटताना पाहायला मिळत आहे. परिणामी सरकारने अनेक निर्बंधही हटवले आहेत. याचाच परिणम व्यावसायिक क्षेत्रावरही झाला आहे. कोरोना रुग्ण घटल्याने नोकर भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. कोरोना विषाणूचा कहर घटल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये नोकरभरती प्रक्रियेत (Hiring Job Activity) कमाली वाढ झाली आहे. नोकरीच्या जॉबस्पीक इंडेक्सनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत अनेक क्षेत्रांनी मजबूत वाढ नोंदवल्यामुळे नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्य एकूण 31 टक्के वाढ झाली आहे.


देशभरातील कोविड प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे नोकरभरती प्रक्रियेमध्ये (Hiring Job Activity) वाढ झाली आहे.फेब्रुवारी 2022 मध्ये नोकरी प्लॅटफॉर्मवर सुमारे 3,074 नोकऱ्या पोस्ट करण्यात आल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 2,356 होती. Naukri.com चे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल म्हणाले की, 'ऑटो आणि स्वयं सहाय्यक सारख्या क्षेत्रांनी दीर्घ कालावधीनंतर पुन्हा जोर पकडल्याने आणि इतर प्रमुख संघटित क्षेत्रांनी वाढ कायम ठेवल्याने, नोकरी शोधणाऱ्यांमध्ये भावना आणि आत्मविश्वास दोन्ही मजबूत होत आहेत.' 


सर्व क्षेत्रांपैकी विमा क्षेत्रामध्ये 2021 मधील फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 2022 च्या फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक 74 टक्के भरतीची वाढ दिसून आली. यानंतर किरकोळ क्षेत्रात नोकरभरतीमध्ये 64 टक्के वाढ झाली. दीर्घकाळापासून मंदीचा सामना करत असलेल्या वाहन उद्योगाने गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 12 टक्के वाढ नोंदवली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha