एक्स्प्लोर

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी पेटीएमकडून  'आता बुक करा, नंतर पैसे द्या' सुविधा, जाणून घ्या कसा घेता येणार लाभ

रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी पेटीएमकडून (Paytm)  'आता बुक करा, नंतर पैसे द्या' (Book Now Pay Later) ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Paytm : पेटीएमद्वारे (Paytm) रेल्वे (Indian Railway ) तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पेटीएमने आपल्या लाभधारकांसाठी एक विशेष सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करताना पैसे भरण्याची गरज भासणार नाही. तर प्रवाशांना तिकीट बुक केल्यानंतरही पैसे देता येणार आहेत. प्रवाशांसाठी ही नवी सुविधा आईआरसीटीसी ( IRCTC ) आणि पेटीएमच्या भागीदारीनंतर सुरू झाली आहे. 'आता बुक करा, नंतर पैसे द्या' (Book Now Pay Later) असे या विशेष योजनेचे नाव आहे.

'आता बुक करा, नंतर पैसे द्या'  ही एक प्रकारची पोस्टपेड सेवा आहे. या सेवेद्वारे प्रवासी पैशाशिवाय रेल्वे तिकीट बुक करू शकतात. ज्या प्रवाशांकडे आरक्षण करताना पैसे नाहीत त्यांच्यासाठी ही सेवा अधिक फायदेशीर आहे. अनेक वेळा असे घडते की एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे आरक्षणाची आवश्यकता असते. काही वेळा त्यावेळी पैसे नसतात. अशा परिस्थितीत पेटीएमची 'आता बुक करा, नंतर पैसे द्या' ही सुविधा प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरेल.

'आता बुक करा, नंतर पैसे द्या' या सुविधेअंतर्गत प्रवाशांना तिकीट बुक केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी 30 दिवसांचा अवधी मिळणार आहे. पेटीएम प्रत्येक महिन्याला वापरकर्त्यांचे बिल तयार करत असते. जेणेकरून ग्राहकांना हे समजू शकेल की महिन्यानंतर एकूण किती पैसे जमा करायचे आहेत. पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसचे सीईओ प्रवीण शर्मा यांनी सांगितले की, पेटीएम ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन पावले उचलत आहे. या नवीन सुविधेमुळे लोकांना आपत्कालीन परिस्थितीत अनेक नवीन सुविधा मिळणार आहेत.

'असे' बुक करा पेटीएमद्वारे रेल्वे तिकीट!
पेटीएमवर रेल्वे तिकीट बुक करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पेटीएमवर रेल्वे तिकीट बुकरण्यासाठी प्रथम तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवर जा. यानंतर, खात्यात लॉग इन करा आणि तिकीटाची माहिती भरा. त्यानंतर पेटीएम पोस्टपेड ऑन पेमेंट पर्यायावर क्लिक करा. यानंतर पेटीएमवर लॉगिन केल्यानंतर ओटीपी टाका. यानंतर तुमचे तिकीट 'आता बुक करा, नंतर पैसे द्या'द्वारे बुक केले जाईल. 

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Anant Ambani Visits Govardhan : अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Embed widget