Pathankot Attack : पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला
Pathankot Attack : पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गेटवर ग्रेनेड फेकल्याची माहिती.
Pathankot Attack : पंजाब (Punjab) च्या पठाणकोट (Pathankot) मध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर हल्ला करण्यात आला आहे. आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी ग्रेनेड (Grenade) फेकल्याची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं सध्या दुचाकस्वारांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेचा कसून तपास सुरु आहे.
पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. दुचाकीस्वारांनी त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकत हा हल्ला केला आहे. त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून दुचाकीस्वारांचा शोध सुरु आहे. या हल्ल्यामुळे पठाणकोटमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरु : एसएसपी
पठाणकोटच्या एसएसपी सुरेंद्र लांबा यांनी सांगितलं की, "प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे की, आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. पुढील तपास सुरु आहे. सांगितलं जात आहे की, गेटसमोरून एक दुचाकी गेली, त्याच वेळी हल्ला झाला. याबाबत सखोल तपास सुरु आहे. आम्हाला चांगला फोटो मिळण्याची आशा आहे."
भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक पठाणकोट
दरम्यान, पठाणकोट भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वायुसेनेचं कॅम्प, लष्कराचा दारूगोळ्याचा डेपो आणि लष्कराच्या दोन ब्रिगेड आहेत. जानेवारी 2016 मध्ये पठाणकोटमधील वायुसेनेच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पठाणकोट वायुसेनेचं कॅम्प त्यावेळी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं. या हल्ल्यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर लष्कराचे 8 जवान शहीद झाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kisan Mahapanchayat : कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं ‘शक्ति प्रदर्शन’, 'चलो लखनौ'चा दिला नारा
- ABP C Voter Snap Poll : कृषी कायदे रद्द करण्याचं श्रेय कुणाचं? सरकार, शेतकरी की, विरोधी पक्ष; जनतेचा कौल काय?
- कृषी कायदे मागे घेतल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचे पंतप्रधानांना खुलं पत्र; या सहा मागण्यावर अजूनही ठाम