नवी दिल्ली : नव्या संसद भवनात (New Parliament Building) 18 सप्टेंबरपासून विशेष अधिवेशन (Special Session) पार पडणार आहे. त्यासाठी मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यासंबंधीची यादी देखील जारी करण्यात आली आहे.  नव्या संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दालन हे तळमजल्यावर असणार आहे. तळमजल्यावरील दालन क्रमांक जी 33 हे अमित शाह यांना देण्यात आले आहे. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे देखील दालन तळमजल्यावरच असणार आहे. तळमजल्यावरील जी - 34 हे दालन त्यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दालन क्रमांक जी-8 देण्यात आले असून पीयूष गोयल यांना जी-30 हे दालन देण्यात आलं आहे. 


अपर ग्राऊंड फ्लोअवर कोणाची दालनं?


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना अपर ग्राऊंड फ्लोअरवरील दालन क्रमांक जी - 31 देण्यात आलं आहे, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दालन  क्रमांक जी- 12, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दालन क्रमांक जी - 11 देण्यात आलं आहे.  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना दालन क्रमांक जी -10 देण्यात आलं आहे. आदिवासी कार्य मंत्री अर्जुन मुंडा यांना दालन क्रमांक जी- 09, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जी - 41 आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना त्याच मजल्यावरील दालन क्रमांक जी- 17 देण्यात आलं आहे.


पहिल्या मजल्यावर कोणाची दालनं?


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना पहिल्या मजल्यावरी एफ- 39, आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना एफ - 38, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांना एफ - 37, ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री गिरिराज सिंह यांना एफ - 36 हे दालन देण्यात येणार आहे.  नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना एफ-20, मंत्री पशुपती कुमार पारस यांना एफ-19, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना एफ- 18, विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांना एफ- 1 आणि मंत्री राजकुमार सिंह यांना दालन क्रमांक एफ -16 देण्यात आलं आहे. 


18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर रोजी संसदेचं विशेष अधिवेशन भरवण्यात आलं आहे. तर गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नव्या संसदभवनात अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज हे जुन्या संसद भवनातच होणार आहे. पावसाळी अधिवेशनात जी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली ती विधेयकं या विशेष अधिवेशनात लोकसभेत मांडण्यात येणार आहेत. 


हेही वाचा : 


Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी काँग्रेस आणि भाजपकडून व्हिप जारी, खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश