काश्मीर : जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक (DSP) हुमायू भट्ट (Humayun Bhat Killed In Anantnag Encounter) हे शहीद झाले. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत हुमायू यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले होते. यावेळी जखमी अवस्थेत त्यांनी पत्नी फातिमाला व्हिडीओ कॉल केला होता. त्यांनी व्हिडीओ कॉलवर बोलताना पत्नी फातिमाला सांगितलं की, 'मी कदाचित वाचणार नाही, आपल्या मुलाची काळजी घे.'
'मी जगण्याची शक्यता कमी'
अनंतनागच्या गडुल कोकरनागमध्ये बुधवारी सकाळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात हुमायू भट जखमी झाले. त्यांना गोळी लागली, त्यावेळी त्यांनी पत्नी फातिमाला व्हिडीओ कॉल करून आपली परिस्थिती सांगितली. ते म्हणाले की, "मला गोळी लागली आहे, मी वाचेन असे वाटत नाही. आपल्या मुलाची काळजी घे."
दहशतवाद्यांशी लढताना हुमायू यांच्या पोटात गोळी लागली
डीएसपी हुमायू भट यांच्या पोटात गोळी लागली होती. त्यांची सासू सय्यद नुसरत यांनी सांगितलं की, हुमायू जखमी अवस्थेत असलेले ठिकाण शोधण्यासाठी हेलिकॉप्टरला वेळ लागला. अतिशय कठीण परिस्थिती हुमायू यांना घटनास्थळावरून थेट श्रीनगरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. रुग्णालयात फातिमा आणि त्याच्या 29 दिवसांच्या मुलाला पाहिल्यानंतर हुमायू यांनी प्राण सोडला. 27 सप्टेंबरला हुमायू आणि फातिमा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार होतं. फातिमा यांना मोठा धक्का बसला आहे. हुमायू भट यांचे वडील गुलाम हसन भट्ट जम्मू-काश्मीर पोलिसातील निवृत्त अधिकारी आहेत.
वडील गुलाम हसन भट्ट यांनी जड अंत:करणाने मुलाला दिला अखेरचा निरोप
शहीद डीएसपी हुमायू भट यांच्या पार्थिवाला वडील गुलाम भट्ट यांनी पुष्पांजली अर्पण केली. गुलाम हसन भट्ट यांनी जड अंत:करणाने मुलाला दिला अखेरचा निरोप दिला. शहीद डीएसपी हुमायू भट यांचे वडील गुलाम हसन भट्ट निवृत्त आयजीपी आहेत. त्यांनी तिरंग्यात लपेटलेल्या हुमायू भट्ट यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. ते हुमायू यांच्या पार्थिवाजवळ शांत उभे होते. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्य सचिव अरुण मेहता, डीजीपी दिलबाग सिंग आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मागे उभे होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :