एक्स्प्लोर

No Confidence Motion Debate Live : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या 22 खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

Parliament Monsoon Session Live: मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

LIVE

Key Events
No Confidence Motion Debate Live : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या 22 खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

Background

 Parliament Monsoon Session Live: मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेची सुरुवात राहुल गांधींपासून (Rahul Gandhi) होण्याची शक्यता आहे. राहुल यांना सोमवारीच खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्यांचं संसद भवनात जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान, याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदी गुरुवारी उत्तर देणार आहेत. दरम्यान या मुद्द्यावर राहुल गांधी काय बोलणार याकडे सध्या लक्ष लागलंय. तसंच आज राहुल गांधी कोणावर निशाणा साधणार हेही पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

 मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव असणार आहे.एनडीएकडे 332 चं संख्याबळ आहे. सरकारला धोका तर नाहीय, पण तरी सभागृहातल्या चर्चेला मात्र सरकारला अखेर सामोरं जावं लागणार आहे. मणिपूरच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नसल्यानं या अविश्वास प्रस्तावाची रणनीती काँग्रेस आणि विरोधकांकडून आखली गेली आहे. मणिपूरच्या मुद्दयावर अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरु होता.  विरोधक पंतप्रधानांच्याच उत्तरासाठी आग्रही होते. अविश्वास प्रस्तावावर उत्तर पंतप्रधानांनाच द्यावं लागतं, त्यामुळे यानिमित्तानं पंतप्रधानांनाच उत्तर देण्यास भाग पाडण्याची रणनीती आखली गेली आहे.

मोदी सरकारविरोधात 2014 नंतर आलेला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. याआधी 2018 मध्ये टीडीपी सरकारनं अविश्वास प्रस्ताव आणला होता. 

कसा सादर होणार अविश्वास प्रस्ताव?

  • अविश्वास प्रस्तावासाठी किमान 50 खासदारांच्या सह्यांचं अनुमोदन असेल तर कुणीही सदस्य अशी नोटीस दाखल करु शकतो 
  •  सकाळी दहा वाजण्याच्या आधी अशी नोटीस दाखल झाली तर त्याच दिवशी सभागृहाच्या पटलावर ती स्वीकारावी लागते
  • त्यानंतर लोकसभा अध्यक्ष त्या प्रस्तावावर चर्चेसाठी वेळ आणि तारीख निश्चित करतात
  • अविश्वास प्रस्तावार मतदान होत असताना जर विरोधकांचं बहुमत दिसलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो
  • स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 27 वेळा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला गेलाय, बहुतांश वेळा तो बहुमतानं फेटाळलं गेलाय
  • अपवाद 1979 मध्ये मोरारजी देसाई आणि 1999 मध्ये वाजपेयींच्या सरकारचा भाजपकडे स्वत:चे 303, एनडीएकडे 332 खासदारांचं पाठबळ आहे.
  • त्यामुळे सरकारला धोका नाही हे तर स्पष्ट आहे. फक्त या निमित्तानं सभागृहात पंतप्रधानांना उत्तरास भाग पाडण्याची नीती यशस्वी होत आहे. मागच्या वेळी 2018 मध्ये मोदी सरकारला 330 खासदारांनी पाठिंबा देत अविश्वास प्रस्ताव हाणून पाडला होता.
19:39 PM (IST)  •  09 Aug 2023

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची कार्यवाही फास्ट ट्रॅकवर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची कार्यवाही फास्ट ट्रॅकवर घेण्यात आली आहे. विधीमंडळाकडून मुद्द्यांची रचना करण्याचे काम सुरु झालेय. सुनावणीवेळी मुद्दे भरकटणार नाही, याची खबरदारी घेण्यास सुरुवात झाली. 

 

14:48 PM (IST)  •  09 Aug 2023

Rahul Gandhi: भाजपच्या 22 खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

Rahul Gandhi: लोकसभेमध्ये कथितरित्या फ्लाईंग किस दिल्याप्रकरणी राहुल गांधांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा सचिवालयातील सूत्रांनी एबीपी नेटवर्कला ही माहिती दिली आहे. राहुल गांधींवर काय कारवाई केली पाहिजे, यावर सध्या विचार सुरू आहे. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं समजतंय. दरम्यान, भाजपच्या 22 महिला खासदारांनी राहुल यांची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्याबाबत त्यांनी पत्रदेखील दिलं आहे. 

14:47 PM (IST)  •  09 Aug 2023

Rahul Gandhi: सभागृहातून जाताना राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप

Rahul Gandhi:  संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. खासदारकी बहाल झाल्यानंतर आज राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले. मात्र आजच्याच दिवशी राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. 

12:51 PM (IST)  •  09 Aug 2023

No Confidence Motion Debate LIVE : माझी एक आई इथे बसली आहे, दुसऱ्या आईची मणिपूरमध्ये हत्या केली : राहुल गांधी

No Confidence Motion Debate LIVE : अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी पुढे म्हणाले की, "तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही. तुम्ही भारतमातेचे मारेकरी आहात. तुम्ही देशद्रोही आहात. माझी एक आई इथे बसली आहे आणि मणिपूरमध्ये माझ्या एका आईची हत्या करण्यात आली. भारतीय सैन्याची इच्छा असेल तर ते एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करु शकतात. सरकारला मणिपूरमध्ये शांतता नको आहे. मोदी देशाचा आवाज ऐकत नाहीत."

12:44 PM (IST)  •  09 Aug 2023

No Confidence Motion Debate LIVE : तुम्ही मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली : राहुल गांधी

No Confidence Motion Debate LIVE : अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे. म्हणजेच त्यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदारांनी जोरदार गोंधळ घालत राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget