Petrol Diesel Price : सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरु आहे. यामध्ये विविध मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येत आहेत. गेल्या दोन दिवसापासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या मुद्यावरुन काल राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा लगावला. त्यामुळं दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं पुन्हा आज संसदेत या मुद्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा दरात वाढ झाली आहे.
दरम्यान, देशातील जनतेला महागाईचा दुहेरी धक्का बसला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलसोबत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एलपीजीच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 84 पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दरात दररोज वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वाढत्या महागाईवर विरोधी पक्षांकडून संसदेत गदारोळ सुरु आहे.
आज पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींबाबत संसदेत चर्चा होऊ होण्याची शक्यता आहे. टीएमसी खासदार डोला सेन यांनी राज्यसभेत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींवर चर्चा करण्यासाठी नोटीस दिली आहे. एलपीजी सिलेंडर आणि वाढती महागाई यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगिती प्रस्तावाची सूचना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: