PM Narendra Modi Speech : अदानींसोबत फोटो दाखवणाऱ्या राहुल गांधींवर मोदींचा पहिला थेट हल्ला, सभागृहातच उत्तर
PM Narendra Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर संबोधन केलं. यावेळी अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मोदींनी थेट हल्लाबोल केला.
PM Narendra Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech Lok Sabha) यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर संबोधन केलं. मात्र मोदी भाषणाला उभे राहण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीला जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी गौतम अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर मोदींनी थेट हल्लाबोल केला. "प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपलं म्हणणं मांडलं. त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येतं की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजतं," असं मोदी म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदींचं संबोधन
माझं सौभाग्य आहे की मला यापूर्वीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलण्याची संधी मिळाली होती. मात्र यावेळी मी धन्यवादासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदनही करु इच्छित आहे. आपल्या व्हिजनरी भाषणात त्यांनी करोडो देशवासियांना मार्गदर्शन केलं. प्रजासत्ताकाचे प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची उपस्थितीत ऐतिहासिकही आहे आणि देशाच्या कोट्यवधी बहिणी-मुलींसाठी प्रेरणाही आहेत.
आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी आदिवासी समाजाचा गौरव तर वाढवलाच. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आदिवासी समाजाचा गौरव वाढतोय, आत्मविश्वास वाढतोय. त्यामुळेच हे सभागृह आणि संपूर्ण देश त्यांचा आभारी आहे. राष्ट्रपतीच्या भाषणात संकल्प ते सिद्धीचा मुद्दा मांडला. जनतेला त्यांनी आपल्या भाषणातून प्रेरणा दिली.
राहुल गांधींना टोला
प्रत्येक सदस्याने या चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपलं म्हणणं मांडलं. त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येतं की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजतं.
या सर्व बाबी समोर आल्यानंतर देश त्याचं मूल्यांकन करत असतो. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व खासदारांचं आभार मानतो. मात्र मी काल पाहात होतो, काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टिम, समर्थक आनंद व्यक्त करत होते. काही लोक खूश होऊन म्हणत होते, यह हुई ना बात. त्यांना झोपही नीट आली, आता ते उठूही शकले नसतील. अशा लोकांना म्हटलं जातं की 'यह कह कह कर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वह अब आ रहे है,' असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.
एक मोठा नेता राष्ट्रपतींचा अपमानही करतो, आदिवासी समाजाप्रती द्वेष दाखवतो, मात्र अशा गोष्टी टीव्हीसमोर बोलल्या गेल्या, ते म्हणजे त्यांच्या जे पोटात होतं ते ओठात आलं.
मला वाटलं होतं, राष्ट्रपतींच्या भाषणावर कोणी सदस्य काही नोंदी लिहून घेतले असतील, त्यावर आक्षेप उपस्थित करतील. पण कोणीही विरोधी खासदारांनी त्याला विरोध दर्शवला नाही. ते सर्व स्वीकारलं याचा मला आनंद आहे.
सभागृहात चेष्टा मस्करी, हास्यविनोद होत राहतात. मात्र राष्ट्रहितासाठी गौरव क्षण आपल्याला मिळत आहेत हे विसरुन चालणार नाही. राष्ट्रपतींच्या भाषणात ज्या गोष्टी होत्या ते 140 कोटी जनतेच्या सेलिब्रेशनचा मुद्दा होता. देशाने सेलिब्रेशन केलं.
100 वर्षानंतर महाभयंकर आजाराची साथ, युद्धजन्य स्थिती अशा स्तिथीतही देशाला ज्यापद्धतीने सांभाळलं गेलं, त्यामुळे संपूर्ण देशाला आत्मविश्वास मिळाला आहे, गौरव मिळाला आहे.
आव्हानांशिवाय आयुष्य नाही
आव्हानांशिवाय आयुष्य नाही, मात्र आव्हानांपेक्षा जास्त सामर्थवान आहे, 140 कोटी जनतेचं सामर्थ्य आहे. आव्हानांपेक्षा त्यांचं धैर्य, साहस मोठं आहे. कठीण काळ, युद्धासारखी परिस्थिती, अनेक देशात असलेली अस्थिरता, भीषण महागाई, अन्नाचा तुटवडा आणि आपल्या शेजारील देशात नागरिकांना खायला अन्न मिळत नाही. अशावेळीही आपला भारत देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
देशाच्या गौरवाचं नेमकं कोणाला वाईट वाटतंय?
आज भारताकडे जगभरातील समृद्ध देश आशेने पाहत आहेत. त्यामुळेच G-20 सारखे देश आपल्याकडे येत आहे. ही 140 कोटी जनतेसाठी गौरवाची बाब आहे. मात्र मला वाटतं, पहिला वाटतं नव्हतं, पण आता वाटतं की यामुळेही काहींना वाईट वाटतंय. 140 कोटी जनतेपैकी ते कोण लोक आहेत ज्यांना याचं वाईट वाटतंय.
जगभरातील देश भारताकडे आशेच्या नजरेने का पाहतायत, त्यामागे काही कारणं आहेत. भारताचं वाढतं सामर्थ्य, भारतात वाढणाऱ्या नव्या संधी, भारताची जागतिक निती अशी काही कारणं आहेत.
भारतात दोन तीन दशकं अस्थिरता होती. आता स्थिर सरकारही आहे आणि निर्णयही होतात. त्यामुळे त्याचं रुपांतर विश्वासात होतंय. एक निर्णायक सरकार, पूर्ण बहुमताने चालणारं सरकार राष्ट्रहिताचे निर्णय घेण्यात कसूर ठेवत नाहीत.
कालानुरुप देशाला जे हवं, तसे निर्णय आम्ही घेत जाऊ. कोरोनाकाळात भारताने जगाला लसीचा पुरवठा केला. कोट्यवधी जनतेला मोफत लस दिली. 125 देशांना जिथे औषधं हवी होती, तिथे औषधं, जिथे अन्य मदत ती केली. त्यामुळेच आज भारताचा जगभरात गौरव होत आहे.
कोरोनाकाळात काही क्षणात हजारो कोटी देशवासियांच्या खात्यात जमा झाले. एक काळ होता छोट्या छोट्या टेक्नॉलॉजीसाठी देश तरसत होता. मात्र आज देश तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने पुढे धावतोय.
कोविन अॅपमुळे एक क्षणात व्हॅक्सिन सर्टिफिकेट उपलब्ध झालं. अन्य देशात हे शक्य नव्हतं ते आता जमू लागलं.
भारतात नवी संधी आहे. संपूर्ण जगाला भारताने कोरोनाकाळात केलेल्या मदतीमुळे हलवून सोडलं. भारताची ताकद सर्वांनी पाहिली. भारत आज मॅन्युफॅक्चर हब या नात्याने उभा राहतोय