नवी दिल्ली : भारताच्या तिबेट सीमेवर चीननं माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्ताननंही भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्याची भाषा सुरु केली आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेचं भारतानं स्वागत केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉक्टर मोईद यूसुफ यांनी शांततेशिवाय सुरक्षित अर्थव्यवस्था शक्य नसल्याचं म्हटलंय आणि सर्वांबरोबर शांततेचे संबंध हेच पंतप्रधान इम्रान खान यांचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. भारत सरकारमधील उच्चस्तरिय सूत्रांनी एबीपीशी बोलताना पाकिस्तानची ही भूमिका सकारात्मक असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आग्रही आहेत. पाकिस्ताननं अलिकडेच दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईची दखलही भारतानं घेतली आहे.
याआधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनीही सर्वच क्षेत्रात मैत्रीचा हात देण्याची भूमिका मांडली होती. बाजवा म्हणाले होते, भारत आणि पाकिस्तानने जम्मू काश्मीरचा मुद्दा शांततेने सोडवला पाहिजे. भारत सरकारनेही जनरल बाजवा यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते.
नवी आव्हानं पाहता देशाची आक्रमकता टिकवणं महत्त्वाचं : लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे
देशाच्या सीमांवर सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती आणि एकंदर वातावरण पाहता लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी देशाची आक्रमता आणखी बळावण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं. लष्करप्रमुखांचं वक्तव्य अशा वेळी करण्यात आलं आहे, जेव्हा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं सैन्य पॅगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन मागे हटत असल्याची माहिती दिली.
संबंधित बातम्या :
कुटुंबासोबत आयुष्य घालवण्याचं सुखही नाही, 18 वर्षांच्या कैदेनंतर पाकिस्तानातून भारतात परतलेल्या हसीना बेगम यांना मृत्यूने कवटाळलं
पुण्यात हरवलेले सत्यवान थेट पाकिस्तानात पोहोचले, सात वर्षांनी घरी परतले
जम्मू-काश्मीरः पाकिस्तानचा आणखी एक धोकादायक कट उधळला; BSF ने कठुआ जिल्ह्यात शोधला बोगदा
शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह