नवी दिल्ली : देशाच्या सीमांवर सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती आणि एकंदर वातावरण पाहता लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी देशाची आक्रमता आणखी बळावण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं. लष्करप्रमुखांचं वक्तव्य अशा वेळी करण्यात आलं आहे, जेव्हा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं सैन्य पॅगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन मागे हटत असल्याची माहिती दिली.


'सेंटर ऑर लँड वॉरफेयर स्टडीज'च्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ‘मल्टी डोमेन ऑपरेशंस: फ्यूचर ऑफ कॉन्फ्लिक्ट्स’ परिषदेमध्ये लष्करप्रमुखांनी देशाच्या सीमा संरक्षणाबाबत महत्त्वाचं वत्तव्य केलं. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या सीमाभागांमध्ये जे काही सुरु आहे, ते पाहता आपण याबाबत विचार करण्याची गरज आहे. सीमांची योग्य आखणी नसल्यामुळं परिणामस्वरुपी क्षेत्रीय भाग आणि सार्वभौमत्वाच्या संरक्षणात आव्हानं उभी राहत आहेत, असं ते म्हणाले.


भविष्यात काही नवी आव्हानं उभी असतीलच यात कोणतीही शंका नाही ही बाब अधोरेखित करत 'लेगसी चॅलेंज'ही फार दूर नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.


क्या बात! 'या' गावच्या ग्रामपंचायतीवर 55 वर्षे एकाच कुटुंबातील सरपंच


देशापुढं असणाऱ्या आव्हानांची तीव्रता आणखी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हेसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक नमूद केलं. मल्टी डोमेन ऑपरेशन्सबाबत सांगताना त्यांनी रणगाडे, हवेत आणि जमिनीवर मारा करणारी लढाऊ विमानं, सरफेस कॉम्बॅटन्ट जे एकेकाळी 20 व्या शतकाच्या युद्धशास्त्राचे मुख्य आधार होते, पण नवीन डोमेनमधील उदयोन्मुख युद्धभूमीतील आव्हानांचा सामना करताना येत्या दिवसांमध्ये यातील अमुलाग्र बदलांकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.