एक्स्प्लोर

पाकमधून येऊन भारतीय मुलीशी लग्न, प्रेम कहाणीचा दुःखद अंत

चंदीगड : एका पाकिस्तानी नागरिकाला भारतीय मुलीवर प्रेम झालं आणि तो तिच्याशी लग्न करण्यासाठी भारतात आला. दोघांचं लग्न झालं, त्यांना एक मुलगाही झाला, पण ही प्रेम कहाणी इथेच संपली आहे. कारण पाकिस्तानी नागरिकाला आता त्याच्या पत्नी आणि मुलाला भारतातच सोडून पाकिस्तानमध्ये पाठवलं जात आहे. 31 वर्षीय अकबर दुर्रानी यांची प्रेम कहाणी एखाद्या सिनेमाप्रमाणेच आहे. पाकिस्तानमधील हैदराबाद येथील ओखरीचे नागरिक दुर्रानी यांच्या पाच वर्षांच्या प्रेमाचा प्रवास जवळपास संपत आला आहे. त्यांना ठराविक काळापेक्षा जास्त दिवस भारतात राहिल्याने व्हिजा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार आहे. फेसबुकवरुन भारतीय मुलीशी ओळख मध्य प्रदेशमधील देवास येथील सोफियाशी दुर्रानी यांचा फेसबुक आणि स्काईपच्या माध्यमातून संपर्क आला. ओळख वाढत गेली आणी या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे सोफियाशी लग्न करण्यासाठी दुर्रानी त्यांच्या आईला घेऊन भारतात आले. 'ती' अट मान्य करुन लग्न दुर्रानी यांनी मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर सोफियाच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि ते लग्नासाठी तयार झाले. पण त्यांनी लग्नानंतर भारतातच रहावं लागेल, अशी अट दुर्रांनींसमोर ठेवली. ती अटही त्यांनी मान्य केली. 2013 साली दुर्रानी आणि सोफिया यांचं लग्न झालं आणि एका वर्षात त्यांना एक मुलगा झाला. पण दुर्रानी पर्यटक व्हिजावर भारतात आले होते. दीर्घकाळ व्हिजाच्या मागणीसाठी त्यांनी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात (एफआरआरओ) अर्ज केला. व्हिजा नियम उल्लंघन प्रकरणी तुरुंगवास दुर्रानी यांनी व्हिजा संपण्याअगोदर दोन महिने अर्ज केला. 'ज्या दिवशी व्हिजाची तारीख संपली त्या दिवशी अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी एफआरआरओ कार्यालयात गेलो पण तिथे गेल्यानंतर व्हिजापेक्षा जास्त काळ भारतात राहिल्याचं सांगत अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवण्यात आलं', असं त्यांनी सांगितलं. एक वर्षाचा तुरुंगवास ऑगस्ट 2015 मध्ये दुर्रानी यांना व्हिजा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 8 ऑगस्ट 2015 रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली आणि पाकिस्तान उच्च आयोगाच्या प्रवास कागदपत्रांसाठी त्यांना एका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. यामध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गेला. पत्नी आणि मुलाला पाकिस्तानमध्ये परवानगी नाकारली दुर्रानी यांच्या प्रेम कहाणीत सर्वात दुःखद गोष्ट अशी की त्यांच्या मुलाला आणि पत्नीला पाकिस्तानमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

''माझी पत्नी आणि मुलगा मला सोडण्यासाठी अमृतसरला आले आहेत.

त्यांना माझ्याशिवाय भारतात राहणं अशक्य होणार आहे.

शिवाय पाकिस्तान उच्च आयोग त्यांना पाकिस्तानमध्ये येण्यासाठी व्हिजा देईल,

याची काहीही खात्री नाही आणि मी व्हिजा नियमांचं उल्लंघन केल्याने मला पुन्हा भारताचा व्हिजा मिळणार नाही'',

अकबर दुर्रानी.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Abhijeet Dipke :  NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
Embed widget