एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये हिंसाचार वाढून अस्थिरता येईल, 370 कलम हटविण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा जळफळाट

भारताच्या या आक्रमक निर्णयाने काश्मीरमध्ये हिंसा वाढेल आणि अस्थिर होईल. भारत जे काही करत आहे तो पर्याय खूप विघातक आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताकडून पीओके मध्ये क्लस्टर बॉम्ब टाकल्याचा देखील आरोप पाकने केला आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस केली आहे. तसंच जम्मू काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव सादर केला आहे. देशभरात चर्चेत असलेलं आणि जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं हे कलम हटवण्याची चर्चा सुरु असताना पाकिस्तानचा मात्र जळफळाट सुरु झाला आहे. पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ' अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी काश्मीर मुद्द्यावरून मध्यस्थी करण्याचे वचन दिले होते. आता ती वेळ आली आहे. स्थिती बिघडत चालली असून एलओसीवर भारतीय सैन्य आक्रमक होत आहे. यामुळे क्षेत्रीय संकट निर्माण होऊ शकते', असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त जवान पाठवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने बैठक घेतली.  या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताने जर काही कारवाई केली तर पाकिस्तान त्याचे उत्तर नक्की देईल. भारताच्या या आक्रमक निर्णयाने काश्मीरमध्ये हिंसा वाढेल आणि अस्थिर होईल. भारत जे काही करत आहे तो पर्याय खूप विघातक आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताकडून पीओके मध्ये क्लस्टर बॉम्ब टाकल्याचा देखील आरोप पाकने केला आहे. सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त 370 कलम  हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली  आहे. पाकिस्तानमधील शेअर बाजारात याचा परिणाम दिसला असून खूप मोठी घसरण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. दरम्यान पाकिस्तानने भारताला पोकळ धमकी दिली असून भारताने अत्यंत धोकादायक खेळी केली असून, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं म्हटलं आहे. भारत सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य ते सर्व पर्याय वापरणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Nepal Floods Marathi News: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती
नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप

Embed widget