एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तान नक्षल्यांना रसद पुरवत असल्याचा संशय, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानी शस्त्रं
नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर देताना दोन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडे एक एसएलआर रायफल, एक 303 रायफल, एक 12 बोर रायफल आणि काडतुसं सापडली आहेत.
रायपूर : छत्तीसगडच्या कांकेरमध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडे पोलिसांना अमेरिकी बनावटीची जी-3 रायफल आढळून आली आहेत. ही शस्त्र सध्या पाकिस्तानी लष्कराच्या वापरात असल्यानं नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवली जातेय का, असा संशय सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.
कांकेरच्या तडोकीत गस्त घालणाऱ्या जवानांसोबत नक्षल्यांची चकमक झाली. त्यावेळी नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर देताना दोन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडे एक एसएलआर रायफल, एक 303 रायफल, एक 12 बोर रायफल आणि काडतुसं सापडली आहेत.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलिसांना अमेरिकन मेड जी-3 रायफल्स हस्तगत केले आहेत. यातली धक्कादायक बाब म्हणजे ही रायफल्स सध्या पाकिस्तानी लष्कराच्या वापरात आहेत.
रायपूरपासून 200 किमी अंतरावर असलेल्या तडोकी भागातील मेलापूर आणि मुरनार या गावात या नक्षलवाद्यांची सभा होती. यासभेसाठी बरेच नक्षलवादी एकत्र जमले होते. ही माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. जिल्हा राखीव पोलीस दलाचे नक्षलविरोधी पथक या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरुवात केली. नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर पोलीस जवानांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते.
दरम्यान, चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement