एक्स्प्लोर

Virat Kohli | विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणांची माहिती

विराट कोहली व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वित्तमंत्री निर्मला सत्यनारायण, लालकृष्ण अडवाणी इत्यादी नामवंत व्यक्ती दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा नावाच्या एका नव्या दहशतवादी संघटनेनं कोहलीला मारण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर विराटच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. या संदर्भातले दस्ताऐवज एबीपी न्यूजच्या हाती लागले आहेत. या दहशतवादी संघटनेच्या हिटलिस्टवर देशातील अनेक नामवंत व्यक्ती आहेत.

एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये विराट कोहलीवर असलेल्या धोक्याची माहिती आहे. दहशतवाद्यांची ही हिटलिस्ट दहशतवादाविरोधात काम करणारी संस्था एनआयएला पाठवली आहे. ही लिस्ट पाठवणाऱ्याने आपल्या नावाच्या जागी ऑल इंडिया लश्कर हाय पॉवर कोझीकोड, केरळ असं लिहिलं आहे.

मात्र विराट दहशतवाद्यांच्या निशाण्यावर का आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पुढील आठवड्यात भारताचा बांगलादेश विरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात विराटही खेळणार आहे. त्यामुळे विराटच्या सुरक्षेची खास काळजी घेण्यात येणार आहे. एखादा क्रिकेटर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

'या' नामवंत व्यक्ती दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

विराट कोहली व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वित्तमंत्री निर्मला सीतारमण, लालकृष्ण अडवाणी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, अजित डोवाल, जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक देखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. संसदेची इमारत आणि आरएसएसचं मुख्यालय देखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे. एनआयए याप्रकरणी अधिक तपास करत आहे. याबाबतची माहिती गृह मंत्रालय आणि इतर सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे.

ओळख लपवण्यासाठी नाव बदलण्याचा डाव 

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेला पाकिस्तान भारतावर दहशतावादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच देशांनी घेतलेली दहशतवादविरोधी भूमिका पाहता पाकिस्तानला हे परवडणारं नाही. त्यामुळे दहशतवादी संघटनेसोबत नाव जोडलं जाऊ नये याची काळजी पाकिस्तान घेत आहे. म्हणूनच दहशतवाद्यांनी नव्या दहशतवादी संघटनेच्या नावाचा उल्लेख केला आहे. ऑल इंडिया लश्कर ए तोयबा या नावामुळे ही संघटना भारतातील असून आमचा यात सहभाग नाही, असं पाकिस्तान पुढे सांगू शकतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget