Pahalgam terror attack Vinay Narwal: काश्मीर खोऱ्यातील तो रोमँटिंग Video विनय नरवाल अन् हिमांशीचा नाहीच; पहलगाममधील व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. नौदलाच्या लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू.

Vinay Narwal died in Pahalgam Attack: काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीयांचा बळी गेला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीने जीव गमावलेल्या या लोकांमध्ये भारतीय नौदलाच लेफ्टनंट पदावर असलेल्या विनय नरवाल यांचाही समावेश होता. विनय नरवाल (Vinay Narwal) आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल (Himnashi Narwal) यांचे अवघ्या आठवडाभरापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर हे दोघेही हनिमुनसाठी निसर्गरम्य अशा पहलगाल येथे आले होते. मात्र, दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळी घालून ठार केले. या हल्ल्यापूर्वी काही क्षण आधी विनय नरवाल आणि हिमांशी हे दोघेही जण बैसरन व्हॅलीत आनंद लुटत होते. त्याच अनुषंगाने व्हायरल झालेला दुसराच व्हिडिओ नरवाल दाम्पत्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
या दोघांनी फिल्मी स्टाईलमध्ये एक व्हिडीओ चित्रीत केला होता. त्यामध्ये पुरुष बॉलीवूड किंग शाहरुख खान याची सिग्नेचर पोझ देताना दिसत आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा (Pahalgam Attack) या दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं सांगण्यात येतंय. नरवाल पती-पत्नीचा हा शेवटचा व्हिडिओ असल्याचेही सांगतिले जाते. मात्र, हा व्हिडिओ नरवाल दाम्पत्याचा नसून दुसऱ्याच कपलचा आहे.
लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाला बुधवारी दिल्ली विमानतळावर भारतीय नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी हिमांशी नरवाल यांनीही आपल्या पतीला रडत मानवंदना दिली होती. दिल्ली विमानतळावरील हे चित्र अत्यंत भावूक करणारे होते. यानंतर विनय नरवाल यांच्या पार्थिवाला त्यांची बहीण आणि वडिलांनी मुखाग्नी दिला. त्यावेळीही स्मशानभूमीत भावूक वातावरण पाहायला मिळाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी सुन्न होऊन बसलेल्या हिमांशी नरवाल यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर, एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो नरवाल यांचा असल्याचे लिहिलं जात आहे. मात्र, तो व्हिडिओ नरवाल दाम्पत्याचा नसून क्रिकेटर आशिष शेरावत आणि कॅबिन क्रू याशिका शर्मा शेरावत यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: शेरावत दाम्पत्याने याबाबत व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
लेफ्टिनेंट विनय नरवाल को बहन और पिता ने दी मुखाग्नि....
— Amandeep Pillania (@APillania) April 23, 2025
#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/WPfAgAtAyh
शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला नाही अन् विनय-हिमांशी काश्मीरला आले
लग्न झाल्यानंतर फिरण्यासाठी आधी विनय आणि हिमांशी युरोपला जाणार होते. पण, शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे ते जम्मू आणि काश्मीरला गेले. युरोपचा व्हिसा रद्द झाला म्हणून दोघे फिरायला काश्मीरला गेले. लग्नानंतर त्यांनी युरोपमध्ये हनिमूनचा प्लॅन केला होता. यासाठी व्हिसासाठी देखील अर्ज केला होता. पण ऐनवेळी व्हिसा मिळू शकला नाही आणि युरोपला जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. यानंतर, 21 एप्रिल रोजी दोघेही जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले. 22 एप्रिल रोजी ते पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेवण केल्यानंतर, ते फिरण्यासाठी गेले. त्यावेळी बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या झाडून ठार केले होते. लेफ्टनंट विनय यांचा वाढदिवस 8 दिवसांनी 1 मे रोजी होता. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसासाठी कुटुंबाने पार्टी आयोजित केली होती. 2 मे रोजी त्यांना पत्नीसह ड्युटीसाठी कोचीला परतावे लागणार होते.
नेवी ऑफिसर लेफ्टिनेंट विनय नरवाल की मौत से पहले का आखिरी वीडियो pic.twitter.com/MxjH9rdWyz
— Vaishali Poddar (@PoddarVaishali) April 23, 2025
आणखी वाचा
Video: काल मृतदेहासमोर सुन्न होऊन बसली, आज लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!























