एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: सुरक्षा दलांनी बैसरन व्हॅलीतून पकडला बुलेटप्रूफ जॅकेट घातलेला संशयित; चौकशी करताच एकही उत्तर देता येईना

Baisaran Valley: पहलगाम हल्ल्यानंतर बैसरन दरीआणि आसपासच्या जंगलांमध्ये सुरू असलेल्या कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधला तणाव आता चांगलाच वाढलाय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार केले जात आहे. दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन घाटीत झालेल्या हल्ल्यानंतर आता बैसरन घाटीच्या (Baisaran) आसपासच्या जंगलांमध्ये कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनदरम्यान काल (5 एप्रिल) रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. (Jammu Kashmir)

जेंव्हा सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयिताला पकडलं तेंव्हा तो बुलेटप्रूफ जॅकेटचे कव्हर घालून असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीची कसून चौकशी केल्यानंतर त्याला कुठल्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता येत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयिताला पोलीसांच्या ताब्यात दिलंय.

बैसरन घाटीत नक्की घडलं काय?

पहलगाम हल्ल्यानंतर बैसरन दरीआणि आसपासच्या जंगलांमध्ये सुरू असलेल्या कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार सोमवारी घडला असून संबंधित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. सुरक्षा दलाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली. विशेष म्हणजे, ही व्यक्ती बुलेटप्रूफ जॅकेटचे कव्हर घालून होती. सुरक्षा दलाच्या जवानांना त्याचे हे वर्तन संशयास्पद वाटले. चौकशीदरम्यान संबंधिताने कोणताही स्पष्ट किंवा समाधानकारक उत्तर दिले नाही. बुलेटप्रूफ जॅकेटचे कव्हर त्याच्याकडे कुठून आले, यासंबंधी विचारले असता त्याला उत्तर देता आलं नाही. 

संशयिताच्या मानसिक स्थितीवर शंका

सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी या व्यक्तीच्या वर्तनावरून त्याच्या मानसिक स्थितीबाबतही शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी आणि वैद्यकीय परीक्षणासाठी या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची ओळख पटवण्याचा तसेच तो कोणत्याही अतिरेकी गटाशी संबंधित आहे का, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे बैसरन घाटी परिसरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जंगल परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असून, इतर कोणतेही संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळून येतात का, यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस यांच्यात समन्वयाने तपास सुरू आहे.

हेही वाचा:

India Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget