एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : दहशतवादी पुढं येऊन उभा राहिला, प्राध्यापकानं समयसूचकता दाखवली, मोठ्या आवाजात कलमा म्हटला अन् संपूर्ण कुटुंब बचावलं

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलागममध्ये दहशतवादी हल्ल्यावेळी तिथं असलेल्या प्राध्यापकानं घटनाक्रम सांगितला. 

Pahalgam Terror Attack पहलगाम : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26  जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या भ्याड हल्ल्यातील अनेक प्रसंग आता समोर येत आहेत. पहलगाम येथील भ्याड हल्ला चार दहशतवाद्यांनी केल्याची माहिती आहे. याच हल्ल्यातून बचावलेल्या देबाशिष भट्टाचार्य यांनी यासंदर्भातील कालच्या घटनेबद्दल माहिती न्यूज 18 आसाम या वृत्तवाहिनीला दिली. ते बैसरण येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तिथंच होते. 

भट्टाचार्य म्हणाले, ते त्यांच्या कुटुंबासह एका झाडा खाली झोपले होते. त्यावेळी अचानक लोकांच्या हालचाली वाढल्या. लोक कलमा वाचत होते, त्यांच्यानुसार मी देखील कलमा वाचण्यास सुरुवात केली. काही क्षणात तिथं दहशतवादी तिथं आले, त्यापैकी एक जण आमच्या दिशेनं आला आणि बाजूला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी मारली. 

यानंतर दहशतवादी भट्टाचार्य यांच्या दिशेनं गेला आणि काय करत आहात असा प्रश्न विचारला. यावर भट्टाचार्य यांनी मोठ्या आवाजात कलमा वाचन सुरु केलं. ते म्हणाले की मला असं करण्यास का भाग पाडलं गेलं माहिती नाही. मात्र, कोणत्या तरी कारणामुळं तो दुसरीकडे निघून गेला. 

देवाशिष भट्टाचार्य म्हणाले परिस्थितीचा अंदाज घेत गपचूप तिथून उठलो आणि  पत्नी आणि मुलासह ऊंचावरील भागाच्या दिशेनं गेलो, दोन तास चालत राहिलो. मार्ग चुकलो होतो मात्र त्यावेळी घोड्यांच्या टापांचे निशाण  होते, त्याच्यावरुन चालणं सुरु ठेवलं आणि एका घोडेस्वाराजवळ पोहोचलो. त्याच्या मदतीनं हॉटेलमध्ये पोहोचलो, घाबरलेलो पण सुरक्षित होतो, असं भट्टाचार्य म्हणाले.  यापुढं बोलताना जीवंत असल्यावर विश्वास बसत नसल्याचं त्यांनी म्हटलं. ते आणि त्यांचं कुटुंब श्रीनगरमध्ये आहे. 

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला बैसरण येथे झाला. पर्यटकांच्या एका गटावर लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टेंस  फ्रंट या दहशतवादी संघटनेनं  भ्याड हल्ला केला. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुषांना वेगवेगळं केलं. यांनतर पुरुषांना स्नायपरनं गोळ्या मारण्यात आला. सुरक्षा दलांनी ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांच्या शोधासाठी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं. 

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे टेन्शन वाढलं, इस्लामाबादवरुन उड्डाण केलेलं प्रायव्हेट जेट दिल्लीत, भारतासमोर नाक घासणार की एक अन् एक स्टाफ परत नेणार?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget