एक्स्प्लोर

लष्करप्रमुखांच्या वक्तव्यानंतर पाक हादरलं, अणूबॉम्बची धमकी

युद्ध झालं आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणं पाकिस्तानने बंद करावं, असं बिपिन रावत यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. युद्ध झालंच तर पाकिस्तानात घुसून मारु, अशा शब्दात रावत यांनी पाकला सुनावलं. भारत आणि पाक दरम्यान सध्या वाकयुद्ध सुरु आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केलंय, की युद्ध झालं आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणं पाकिस्तानने बंद करावं. 12 जानेवारीला बिपिन रावत यांनी ही भूमिका मांडली आणि पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या. त्यामुळे पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलं. ''भारतीय सेना प्रमुखांकडून आलेलं विधान जबाबदारीने केलेलं नाही. जर भारत आमच्याकडून अणूबॉम्ब युद्धाची भाषा करत असेल तर आम्हालाही आमची ताकद दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे जनरल बिपिन रावत यांच्या मनातली शंका दूर होईल'', असं ख्वाजा असिफ यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्याच मंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. ''भारताच्या सेना प्रमुखांनी दिलेली धमकी ही भारताच्या नव्या विचारांना स्पष्ट करते. कोणत्याही गैरसमजात राहू नका. कारण, पाकिस्तान आपल्या शस्त्रास्त्रांनीशी पूर्णपणे सज्ज आहे'', असं पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. कुणाची ताकद किती? पाकिस्तानने मोठ-मोठ्या बाता मारण्याच्या आधी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की ग्लोबल फायरच्या अहवालानुसार भारत हा जगातला सगळ्यात शक्तिशाली असा चौथा देश आहे, तर पाकिस्तानचा क्रमांक यामध्ये 13 वा आहे.
  • भारताकडे सुमारे साडे 13 लाख सैनिकांची फौज आहे, तर पाकिस्तानकडे 6 लाखांची
  • भारताकडे सुमारे 4426 रनगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे 2924
  • भारताकडे असणाऱ्या लढाऊ विमानांची संख्या 2100 च्या घरात आहे, तर पाकिस्तानकडे 950
  • भारताकडे 3 विमानवाहक युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे एकही नाही.
  • भारताकडे 15 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे 8
  • भारताकडे 110 ते 120 अणुबॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे 120 ते 130
म्हणजेच भूमी, जल आणि वायू या तिन्ही पातळ्यांवरच्या युद्धासाठी भारत हा पाकिस्तानपेक्षा 100 टक्के उजवा आहे आणि त्यामुळे जर युद्ध झालं तर 1965, 71 आणि 99 सारख्या युद्धाची परिस्थिती पाकिस्तानला सहन करावी लागू शकते. त्यामुळे लष्कर प्रमुख बिपिन रावतांच्या भूमिकेला पाकिस्तानने अजिबात सल्ला वगैरे न समजता आव्हान समजणं गरजेचं आहे. अन्यथा भारत आपल्या शत्रूशी दोन हात करण्यासाठी भक्कमपणे उभा राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Bihar Boat Accident : भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
Mamata Banerjee : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget