एक्स्प्लोर

गोव्यात परराज्यातून येणाऱ्या मासळीवर 6 महीने बंदी, सिंधुदुर्गला बसणार मोठा फटका

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज ही घोषणा करताना सोमवारी खात्याचा आदेश जारी होईल, असे स्पष्ट केल्याने त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. फॉर्मेलिनबाबत गोवा सरकारने कडक भूमिका घेतल्यापासून सिंधुदुर्गची मासळी गोव्यात विकणे कठीण झाले असून त्यावरून राजकारण देखील रंगू लागले आहे.

पणजी : गोवा सरकारने आयात मासळीवर सहा महिन्यांकरिता पूर्ण बंदी घातली असून गरज पडल्यास पुढेही आणखी सहा महिन्यांनी बंदी काळ वाढविला जाणार आहे. या बंदीचा फटका गोव्यात मासळी निर्यात करणाऱ्या इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज ही घोषणा करताना सोमवारी खात्याचा आदेश जारी होईल, असे स्पष्ट केल्याने त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. फॉर्मेलिनबाबत गोवा सरकारने कडक भूमिका घेतल्यापासून सिंधुदुर्गची मासळी गोव्यात विकणे कठीण झाले असून त्यावरून राजकारण देखील रंगू लागले आहे. फॉर्मेलिन वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. क्वालिटी इन्स्पेक्शनची कौन्सिलची प्रयोगशाळा गोव्यात स्थापन झाल्यावर तसेच आयात मासळी तपासण्याची पूर्ण व्यवस्था झाल्यानंतरच आयातबंदी उठविली जाईल. नंतर मासळीची तपासणी एफडीए करणार नाही तर आंतरराष्ट्रीय एजन्सीच तपासणी करणार आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले. परराज्यातून गोव्यात मासळी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये एफडीएकडे नोंदणी तसेच इन्सुलेटेट वाहन सक्तीचे करण्यात आले होते. तशी मार्गदर्शक तत्त्वेही सरकारने जारी केली होती परंतु एकाही मासळी व्यापाऱ्याने अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नाही. काहींनी पळवाट शोधत आंतरराज्य बसगाड्यांमधून छुप्या पध्दतीने मासळी आयात सुरु केली आहे. मडगाव नंतर आज पणजी मध्ये देखील तसा प्रकार उघड झाला आहे. आज मुंबईहून जीए-03-एन-5670 क्रमांकाच्या खाजगी लक्झरी बसमधून मासळीच्या पेट्या आणण्यात आल्या. मेरशी येथे या पेट्या उतरवण्यात आल्या. एफडीए अधिकाऱ्यांनी मासळीच्या पाच पेट्या जप्त केल्या तसेच जुने गोवे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ही बस कोलवाळ येथील मंदार अजित पार्सेकर यांच्या मालकीची असून मुंबई येथील प्रताप संपद मोरे नामक व्यक्तीने सावंतवाडी येथील डॉमनिक डिसोझा याच्यासाठी ही मासळी भरली होती व ती म्हापसा येथे उतरविण्यात येणार होती, अशी माहिती मिळाली आहे. आंतरराज्य बसगाड्यांमधूनही मासळी आयात सुरु झाल्याने या विषयाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यापुढे आंतरराज्य बसगाड्यांचीही कडक तपासणी करण्यात येणार असून एफडीए, पोलिस अधिकारी बसमालक तसेच मासळी आणणाऱ्यांविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाई करतील, असे राणे यांनी स्पष्ट केले. आयात मासळीमध्ये फॉर्मेलिन रसायन सापडल्याने जुलै महिन्यापासून राज्यात खळबळ उडाली होती. फॉर्मेलिनचे माणसाने सेवन केल्यास दुर्धर रोग जडण्याचा धोका असतो त्यामुळे मासळी खरेदी करताना आजही गोवकर धास्ती बाळगून आहेत. गोव्यात शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळमधून मोठ्या प्रमाणात मासळी आयात केली जात होती.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget