नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाला रामराम ठोकणार असल्याचं दिसत आहे. तसं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे. लवकरच तुम्हाला यासंदर्भात कळवेन असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेक दिग्गजांसह सामान्य माणसांनीही यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी मोदींना सोशल मीडिया सोडू नका, अशी विनंतीही केली आहे. तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासमवेत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी मोदींवर टिका करण्यास सुरुवात केली आहे.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदीजी द्वेष सोडा, सोशल मीडिया नको, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या मनात द्वेष आहे, अशी टीका अनेक वेळा राहुल गांधी यांनी केली आहे.





काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, 'सन्माननिय पंप्रधानजी, तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही त्या ट्रोलर्सच्या फौजेला हा सल्ला द्या की, जे तुमच्या नावाने दर सेकंदाला अपशब्दांचा वापर करत धमक्या देतात.'





अखिलेश यादन यांनी ट्वीट केलं आहे की, 'सामाजिक संवादाचे रस्ते बंद करण्याचा विचार करणं योग्य गोष्ट नाही. सोडण्यासाठी अनेक गोष्टी आहेत साहेब. जसा सत्तेचा मोह, विद्वेषाच्या राजनितीचा विचार, मन-मर्जी करण्याच्या गोष्टी, निवडक मीडियाशी विचारलेले तुमच्या आवडीचे प्रश्न आणि विश्व विहार. कृपया या गोष्टिंवर विचार करा.'





बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही ट्वीट केलं आहे की, 'विचार करतोय की, सोमवारी काय कराव?'





जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय लीडर कन्हैया कुमार यांनीही ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, 'जीडीपी लगी गिरने तो टीआरपी स्टंट लगे बढ़ने!! #DhyaanBhatkaoYojna'





पंतप्रधान मोदींच ट्वीट


पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन' कदाचीत ते समाज माध्यामाच्या जगातून कायमचा रामराम ठोकण्याच्या विचारात असल्याचे या ट्वीटवरून दिसत आहे. ट्वीटरवर सर्वाधिक फॉलो करणाऱ्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे राजकीय नेते आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे 53.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी फेसबुकवर चार करोड 47 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. याशिवाय इन्स्टाग्रामवर त्याचे 35.2 मिलीयन फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींचे युट्यूबवर साडेचार मिलीयन सबस्क्रायबर आहेत.


संबंधित बातम्या : 


नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया सोडण्याचे संकेत, येत्या रविवारी मोठा निर्णय घेणार


जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय


मुख्यमंत्री ते पंतप्रधान... मोदींचा अकरा वर्षांचा ट्विटर प्रवास!