एक्स्प्लोर
जम्मू काश्मीरच्या पुलवाम्यात सुरक्षा रक्षक-दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान
जम्मू-काश्मीरमधील पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या पुन्हा कुरापती; लपून बसलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु, एका दहशतवाद्याला कंठस्नान
पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाने अवंतीपुरा भागात चालू असलेल्या चकमकीत एका दशहतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. या भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सरु आहे. तर एक ते दोन दहशतवादी लपलेल्याची माहिती आहे.
दहशतवाद्यांसोबतची चकमक रात्री उशीरापासून सुरु आहे. सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण भागाला चारही बाजूंनी वेढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या पुन्हा कुरापती करायला सुरुवात केली आहे. पण भारतीय सुरक्षा रक्षकांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
हिजबुल दहशतवाद्याला अटक
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सक्रीय असलेल्या हिजबुलच्या दहशतवाद्याला भारतीय सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याकडे एक बंदूक सापडली आहे. मंगळवारी टटना शेखापुरा भागात एक दशहतवादी लपलेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सर्च ऑपरेशन करण्याच आलं होतं.
भारतीय सुरक्षा रक्षक, निमलष्करी दल आणि जम्मू आणि पोलीस यांच्या मार्फत हे सर्च ऑपरेशन चालवलं. दहशतवाद्याला चारही बाजून घरण्यात आलं. या वेळी दहशतवाद्याने पळ काढताना त्याला अटक करण्यात आली.
जम्मू-काश्मीरच्या अवंतीपुरामध्येदेखील दहशतवाद्यांशी चकमक सुरु
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाने अवंतीपुरा भागात चालू असलेल्या चकमकीत एका दशहतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. या भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सरु आहे. तर एक ते दोन दहशतवादी लपलेल्याची माहिती आहे.
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडामध्ये रविवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद झाले आहेत. यात एक कर्नल, एक मेजरसह दोन जवानांचा समावेश आहे. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. यानंतर या परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात देखील शनिवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यात लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर हैदरला कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील दंगेरपुरा परिसरात सुरक्षा दलाने ही कारवाई केली.
UAPA Amendment Bill | दहशतवाद्याला कुठलीही जात-धर्म नसतो : गृहमंत्री अमित शाह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement