एक्स्प्लोर
RTI: नोटाबंदी दिवशी RBI ची स्थिती काय होती?

मुंबई: नोटाबंदीला महिना उलटल्यानंतर अजूनही परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. पंतप्रधान मोदींनी 50 दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र ज्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली, त्यादिवशी रिझर्व्ह बँकेची काय स्थिती होती, याबाबतची माहिती RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली आणि त्यांच्या हाती विशेष माहिती लागली आहे. 8 नोव्हेंबरला 2 हजार रुपयांच्या 4 लाख 94 हजार 640 कोटींच्या नोटा छापून तयार होत्या, अशी माहिती आरबीआयने गलगलींना दिली. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांसह रिझर्व्ह बँकेलाही 500 आणि 1000 रुपयांच्या 20 लाख 51 हजार 166.52 कोटी चलनावर पाणी सोडावं लागलं. भारतीय रिजर्व बँकेने त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकच्या एक चतुर्थांश चलनाची छपाई केली. नोटाबंदी दिवशी RBI ची स्थिती
- ज्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली, त्यावेळी भारतीय रिजर्व बँकेकडे, 500 रुपयाची एकही नवी नोट नव्हती.
- नव्या 2000 रुपयांच्या 24 हजार 732 कोटी नोटा ज्याची किंमत 4,94,640 कोटी होती.
- याउलट ज्यादिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी केली, त्यावेळी आरबीआयकडे 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपये मूल्यांच्या एकूण चलनाची संख्या 12,42,300.1 कोटी होती. तर त्याची एकूण किंमत 23,93,753.39 कोटी होती.
- यात 500 आणि 1000 मूल्यांच्या चलनाची संख्या 3,18,919.2 कोटी होती, ज्याची एकूण किंमत 20,51,166.52 कोटी होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम























