एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नरेंद्र मोदी आणि अमित शाह म्हणजे ODOMOS : ओमर अब्दुल्ला
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना ओडीओएमओएस ( ओव्हरडोस ऑफ ओन्ली मोदी ओन्ली शाह : ओडोमॉस) असे संबोधले आहे.
जम्मू-काश्मीर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसबद्दल बोलताना काँग्रेसला 'ओआरओपी' असे संबोधले होते. त्यावर उत्तर देताना आज नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना ओडीओएमओएस ( ओव्हरडोस ऑफ ओन्ली मोदी ओन्ली शाह : ओडोमॉस) असे संबोधले आहे. देशाला या ओडोमॉसमुळे खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने नुकतेच पक्षाच्या सरचिटणीसपदी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांची नियुक्ती केली. त्यावर भाजपने टीका सुरु केली आहे. त्यावरुन टीका करताना अमित शाह म्हणाले काँग्रेस हा पक्ष म्हणजे ओआरओपी (ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका) आहे. त्याला आज ओमर अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले.
हिमाचल प्रदेशमधील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले होते की, मोदी सरकारने 'वन रँक वन पेन्शन'च्या (ओआरओपी) माध्यमांतून माजीसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित केलं. मात्र, काँग्रेसने ‘ओन्ली राहुल, ओन्ली प्रियंका’(ओआरओपी)द्वारे केवळ राहुल प्रियांका या दोघांचेच भविष्य सुरक्षित केले.
While the rest of the country suffers from too much ODOMOS - overdose (of) only Modi only Shah. https://t.co/PD1GoJbcIz
— Omar Abdullah (@OmarAbdullah) January 28, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
करमणूक
राजकारण
क्रीडा
Advertisement