एक्स्प्लोर
कच्च्या तेलाचे भाव वाढले, पेट्रोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता
अमेरिकेच्या तळावर इराणने क्षेपणास्त्रे हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आता याचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर झाला आहे. तेलाच्या किंमतीत 4.53 टक्क्यांची वाढ बघायला मिळते आहे.. याचा मोठा जागतिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

नवी दिल्ली : इराण- अमेरिका हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले आहे. त्यामुळे तेलाचे दर साडे तीन टक्क्यांनी वाढली आहे. तेलवाढीचा परिणाम भारतातील पेट्रोलच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. इराणचे लष्करप्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिाका या देशांमध्ये तणाव वाढला आहे. WTI इंडेक्सवर तेलाची किंमत प्रति बॅरल 4.53 टक्क्यांनी वाढून 65.54 डॉलरवर गेली आहे. अशा परिस्थितीत महागड्या कच्च्या तेलाचा परिणाम घरगुती पेट्रोल-डिझेलच्या दरावर पडेल. तज्ज्ञांचे मते सध्या भारत 80 टक्के कच्चे तेल परदेशी बाजारपेठेतून खरेदी करतो. या महागड्या कच्च्या तेलाचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसेल. विश्विक वित्तीय सेवा कंपनी नोमुराच्या मते कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 10 डॉलरची वाढ झाल्याने याचा परिणाम भारताच्या तिजोरीवर होतो. अमेरिकेने 3 जानेवारी रोजी सुलेमानीची हत्या केली. तेव्हापासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाची शक्यता आहे. इराणने इकरमधील अमेरिकेच्या सैन्याच्या तळांना लक्ष्य केले आहे.
नवीन वर्षात सलग सहा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर बुधवारी स्थिरता कायम राहिली. मात्र , आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ पाहता आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईपासून दिलासा मिळण्याची कोणतीही आशा नाही. तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे. 75.74 रूपये, 78.33 रूपये, 81.33 रूपये आणि 78.69 रूपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर चार महानगरांमध्ये डिझेलची किंमतही अनुक्रमे. 68.79 रुपये, 71.15 रुपये आणि 72.94 रुपये प्रति लिटरवर स्थिर राहिली आहे.Oil prices spike more than 3.5% after Iran hits base used by US in Iraq: AFP news agency
— ANI (@ANI) January 8, 2020
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























