भुवनेश्वर : ओडिशामध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. कटकमधील निरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रूळावरून घसरल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातात 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 6 लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सलगाव आणि नरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे आठ डबे रूळावरन घसरले आणि अपघात झाला. या घटनेत जवळपास 40 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली आहे.





सहा डबे रूळावरून घसरले


लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताबाबत असं सांगण्यात येत आहे की, धुक्यामुळे ट्रेन मालगाडीला ठोकली आणि रूळावरून घसरली. यामध्ये ट्रेनचे सहा डबे रूळावरून घसरले आहेत. अपघात झालेली ट्रेन महाराष्ट्रातील मुंबईहून ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला जात होती. या ट्रेनचं नाव मुंबई - भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस असं आहे.


रेल्वेकडून बचावकार्य सुरू


समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. अपघात ज्या ठिकाणी घडला तिथे आजूबाजूला जंगल आहे. समोर आलेल्या फोटोंवरून तिथे असलेल्या धुक्याचा अंदाज येत आहे.


संबंधित बातम्या : 


भारतीय हवाईदलात सहभागी होणार ब्रह्मोस मिसाइल असलेलं 'सुखोई फाइटर जेट'

कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच 36 केंद्रीय मंत्री करणार जम्मू-काश्मीरचा दौरा

निर्भया प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी नाही....