जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा जम्मू-काश्मीरचा विकास योग्य प्रकारे कसा करता येईल, याविषयी माहिती देण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे. 17 जानेवारीला मोदींच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा जम्मू-काश्मीचा दौरा निश्चित होणार आहे. मंत्र्यांचा जम्मू-काश्मीर दौरा 18 ते 25 जानेवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जम्मू आणि काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशात 19 जानेवारीला भेट देण्याची शक्यता आहे.
Navneet Rana | राणा दाम्पत्याने लुटला पतंगबाजीचा आनंद, संक्रांतीनिमित्त घेतला उखाणा | अमरावती | ABP Majha
मोदी सरकारने गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याची घोषणा केली. तसेच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशा (जम्मू-काश्मीर आणि लडाख) मध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता.
संबंधित बातम्या :
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीदेवीचा फोटो नोटांवर छापा : सुब्रमण्यम स्वामी
बॉक्स ऑफिसवरच नाही तर गुगलच्या ट्रेंडमध्येही 'तानाजी' 'छपाक'च्या वरचढ