(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिहार निवडणुकीच्या अंतिम निकालासाठी प्रतीक्षा करावी लागेल; निवडणूक आयोगाने सांगितले कारण
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की मतमोजणी दरम्यान कोरोनाचा प्रोटोकॉल पाळला गेला आहे. मोजणी सभागृहात 14 ऐवजी केवळ सात मतमोजणी टेबल आहेत. सरासरी 35 फेऱ्ंमध्ये मतांची मोजणी केली जाईल. रात्री उशिरापर्यंत निकाल येऊ शकतात.
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार कोरोना संकटामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. कोरोनामुळे मतमोजणीचे नियम बदलण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की मतमोजणी दरम्यान कोरोनाचा प्रोटोकॉल पाळला गेला आहे. मोजणी सभागृहात 14 ऐवजी केवळ सात टेबल आहेत. सरासरी 35 फेऱ्यामध्ये मतांची मोजणी केली जाईल. रात्री उशिरापर्यंत निकाल येऊ शकतात.
निकाल वेगाने बदलतायेत बिहार विधानसभा निवडणुकीतील 243 जागांपैकी 11 जागांवर निकाल जाहीर झाला आहे. भाजपने 5, आरजेडी आणि जेडीयूने दोन जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस आणि व्हीआयपी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. यावेळी ट्रेंडमध्ये एनडीए 120 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधन 115 जागांवर पुढे आहे. बिहारमधील आकडेवारीचे ट्रेंड वेगाने बदलत आहेत. सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राजदने आता राज्यात भाजपला मागे टाकले आहे. भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे आणि 78 जागांवर राजद पुढे आहे.
एआयएमआयएम पाच, बसपा 1 आणि अपक्ष तीन जागांवर पुढे होते. एलजेपी कोणत्याही जागेवर आघाडीवर नाही. निवडणुकीत जेडीयूच्या उमेदवाराच्या विरोधात एलजेपीने आपला उमेदवार उभा केला होता.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, मतमोजणीत भाजपाने 72 जागांवर आघाडीवर आहे तर 5 जागा जिंकल्या आहेत. त्याचा सहयोगी जेडीयू 40 जागांवर आघाडीवर असून दोन जागा जिंकल्या आहेत.
3733 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी 66, काँग्रेस 21 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप 74, जेडीयू 48, हम दोन जागांवर आघाडीवर आहेत तर 33 जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत.
Bihar Election Results | दहा तासांनंतरही कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, बिहार निवडणुकीची मतमोजणी अजून सुरूच