SBI : एसबीआयनं प्रेग्नेंट महिलांना अनफिट सांगितलं होतं. दिल्ली महिला आयोगाकडून (Delhi Commission for Women) यासंदर्भात एसबीआय व्यवस्थापनाला नोटीस जारी करत उत्तर मागितले आहे.  एसबीआय व्यवस्थापनेनं प्रेग्नेंट महिलांना कामावर रुजू करुन घेण्याबाबतीत नियमात बदल केले आहेत. पूर्वी 6 महिने प्रेग्नेंसी असताना त्यांना कामावर रुजू करुन घेतले जायचे. पण आता 3 महिन्यांच्यावर जर प्रेग्नेंसी असेल तर महिलांना कामावर रुजू करुन घेतले जाणार नाही त्यांना  'टेम्पररी अनफीट' मानले जाणार आहे आणि डिलिव्हरीच्या 4 महिन्यांनंतर त्यांनी सेवेत रुजू झाले पाहिजे अशी तरतूद केली आहे. 






प्रेग्नेंसी ही disformity म्हणून गृहित धरणं बुरसटलेल्या विचाराचे प्रतिक आहे. कामगार कर्मचाऱ्यांनी लढाईतून मिळवलेला मॅटर्निटी लिव्हचा हक्क हा वेगळ्या पद्धतीनं हिरावून घेण्याचा एसबीआय व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. प्रमोशननंतर देखील हाच नियम एसबीआय व्यवस्थापन लागू करु पाहात आहे. जर असं झालं तर इतरही बॅंका अशाच प्रकारे नियम बनवतील आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील. यासाठी आॅल इंडिया बॅंक एम्प्लाॅईज युनियनकडून एसबीआय व्यवस्थापनाला पत्र पाठवण्यात आलं असून हा निर्णय मागे घ्यावा असे सांगण्यात आलंय. जर हा निर्णय मागे नाही घेतला तर कायदेशीर लढाई लढू. एसबीआयचा हा निर्णय कायद्याला धरुन नाही, असंही आॅल इंडिया बॅंक एम्प्लाॅईज युनियनकडून सांगण्यात आलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha