CISF Fireman Constable Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर cisfrectt.in वर कॉन्स्टेबल / फायरमन (CISF कॉन्स्टेबल भर्ती 2022) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे. CISF कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2022 असणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, CISF देशभरात एकूण 1149 रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या पदासाठी उमेदवार 12 वी पास असावा. तर, अर्जदाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे अशी अट आहे.
CISF कॉन्स्टेबल पदासाठी सर्व माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 29 जानेवारी 2022 रोजी उपलब्ध होईल. शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET),डॉक्युमेंट्स पडताळणी (DV)तसेच लेखी चाचणीसाठी बोलावले जाईल.
महत्त्वाची माहिती
सीआयएसएफ (CISF)कॉन्स्टेबल अर्ज सुरु करण्याची तारीख – 29 जानेवारी 2022
सीआयएसएफ (CISF)कॉन्स्टेबल अर्जाची शेवटची तारीख – 04 मार्च 2022
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी इच्छुक अर्जदारांना विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबलची वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष आहे. उमेदवारांची उंची 170 सेमी आणि छाती 80-85 सेमी असावी.
अर्ज कसा करायचा?
1.CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://cisfrectt.in.
2. मुख्यपृष्ठावरील "लॉगिन" बटणावर क्लिक करा.
3. नवीन नोंदणी बटणावर क्लिक करा.
4.आता तुमचे डिटेल्स भरा.
वेतन (21,700 रूपये -69,100 रूपये)
निवड प्रक्रिया :
अर्जदारांची निवड खाली दिलेल्या निकषांच्या आधारे केली जाईल.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी परीक्षा
डॉक्युमेंट्स पडताळणी
मेडिकल टेस्ट
महत्वाच्या बातम्या :
- 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार घसघशीत वाढ?
- पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार
- धक्कादायक... PUBGचं घातकी व्यसन! 14 वर्षाच्या मुलानं अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha