एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातमध्ये पुन्हा नोटांचा पाऊस, भजनसंध्या कार्यक्रमात नोटांची उधळण
नवसारी : संपूर्ण देशात सुट्या पैशांची चणचण भासत असताना लोक सुट्या पैशांसाठी दारोदोर भटकत असताना गुजरातमध्ये मात्र पुन्हा एकदा नोटांचा पाऊस पडला आहे.
गुजरातमधील नवसारीत आयोजीत भजनसंध्या कार्यक्रमात कलाकारांवर अक्षरश: पैशाचा पाऊस पाडण्यात आला. गुर्जर समाजाच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात कलाकारांवर 10, 20,50 आणि 100 रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या.
गुर्जरांच्या समाज भवनासाठी या भजनसंध्येचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात कलाकार फरीदा मीर आणि मायाभाई आहिर यांच्यावर नोटांची यथेच्छ उधळण करण्यात आली.
सुरतमधील कार्यक्रमात 2 कोटींची उधळण, रक्कम शहीदांच्या कुटुंबीयांना देणार
यापूर्वीही सुरतमध्ये एका सांगितीक कार्यक्रमात गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर तब्बल 2 कोटी रुपयांची उधळण करण्यात आली होती. सुरतचे व्यापारी महेश सवाणीने उरी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘वतन के रखवाले’ हा भजन कार्यक्रम आयोजित केला होता. यात पुरुष, महिलांसह लहान मुलांनीही पैसे उडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमात सुमारे 2 कोटी रुपयांचा अक्षरश: पाऊस पडला. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/ANI_news/status/813251763738263552अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement