Non-Resident Indian Day 2023 : NRI किंवा प्रवासी भारतीय दिन (Non-Resident Indian Day) दरवर्षी 9 जानेवारी रोजी भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणूनच महात्मा गांधीजींच्या भारतात आगमनाच्या स्मरणार्थ 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्रवासी दिनाच्या दिवशी, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात परदेशात विशेष कामगिरी करून भारताचं नावलौकिक केलं आहे त्या भारतीयांचा सन्मान केला जातो.
प्रवासी भारतीय दिन केव्हापासून सुरु करण्यात आला? (Non-Resident Indian Day History 2023) :
प्रवासी दिवस 2003 पासून सुरू करण्यात आला होता परंतु 2015 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली आणि दर दोन वर्षांनी तो साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 2021 मध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला होता.
प्रवासी भारतीय दिन साजरा करण्यामागचा उद्देश (Non-Resident Indian Day Importance 2023) :
परदेशी भारतीयांना देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे परदेशी भारतीयांचे नेटवर्क तयार करणे हा एक उद्देश आहे. तसेच, भारतीय तरुणांना परदेशी भारतीयांशी जोडणे, गुंतवणुकीच्या संधी वाढवणे, परदेशातील भारतीय समुदाय महत्त्वाच्या उपक्रमांसाठी देशातील सरकार आणि नागरिकांशी सहज संपर्क साधू शकतो. असा यामागचा उद्देश आहे.
प्रत्येक वेळी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त सरकारतर्फे देशात मोठ्या परिषदेचे आयोजन केले जाते. प्रवासी भारतीय दिवस (Non-Resident Indian Day) अधिवेशन यावेळी 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान मध्य प्रदेशातील इंदूर शहरात साजरा होत आहे. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य मोठे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
प्रवासी भारतीय दिनाची 2023 थीम (Non-Resident Indian Day Theme 2023) :
प्रवासी भारतीय दिनाची 2023 थीम (Theme) 'प्रवासी: अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे विश्वसनीय भागीदार' अशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :