IPS Aslam Khan Success Story: जयपूरमधील एक विद्यार्थिनी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने इतकी प्रभावित झाली की ती त्यांची भक्त बनली. या पोरीनं पुढं जाऊन प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाचा झेंडा रोवला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशातील सर्वात अवघड परीक्षा पास केली अन् आयपीएस झाली. हे करत असतानाही सामाजिक जाण सुटू दिली नाही. मदतीचा हात नेहमीच पुढं करणाऱ्या IPS अस्लम खान असं या महिला पोलिस अधिकाऱ्याचं नाव. आता आपण म्हणाल की, महिला अधिकारी आणि नाव अस्लम. तर या नावामागची कहाणी देखील तितकीच रंजक आहे. 


आज आपण अस्लम खान यांच्या आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत. अस्लम खान एक सच्च्या आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख. त्या सध्या गोव्यात कार्यरत आहेत.  अस्लम या नावाचा अर्थ सुरक्षा असा संदर्भाने येतो, या नावाला अस्लम खान खऱ्या अर्थानं जगतात.  


अस्लम खान नावामागील रंजक कथा


अस्लम खानचं हे नाव कसं? असा सवाल अनेकांना पडत असेल.  त्यामागे एक छोटीशी कथा आहे. त्यांच्या वडिलांना मुलाच्या जन्माची अपेक्षा होती. मात्र त्यांना झाली मुलगी.  मुलाच्या जन्मापूर्वीच वडिलांनी मुलाच्या नावाचा विचार केला होता. पण मुलगीच झाली म्हणून तिचे नाव अस्लम ठेवण्यात आले. मात्र वडिलांनी त्यांचं संगोपन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांना चांगले शिक्षण दिले. यामुळे 2007 मध्ये अस्लम खान या आयपीएस अधिकारी बनल्या. 


अस्लम खान या 2007 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी. एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. अस्लम खान यांचे बालपण गरिबीत गेले.  त्यांच्या वडिलांकडे कधीच इतके पैसे नव्हते की ते त्यांना त्यांच्या वाढदिवसाला चॉकलेटही खायला देऊ शकतील.  






अस्लम खान या सध्या गोव्यात DIGP पदावर कार्यरत


अस्लम खान या सध्या गोव्यात DIGP पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिल्लीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याचे पोलिस उपायुक्तपदही भूषवले आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. अस्लम यांचे पती पंकज कुमार सिंह हे 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 


काही रिपोर्ट्सनुसार, अस्लम खान या आंतरराष्ट्रीय सीमेवर वसलेल्या सुचेतगड गावातील एका कुटुंबाला आपल्या पगाराचा अर्धा भाग पाठवतात. तसेच त्या कुटुंबाला फोन करून त्यांची विचारपूसही करतात. त्याचं झालं असं त्या काम करत असलेल्या कार्यक्षेत्रात  9 जानेवारी 2018 रोजी जम्मू येथील ट्रॅक ड्रायव्हर मानसिंगची दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दरोड्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली होती. 5 सदस्यांच्या कुटुंबातील मानसिंग हा एकमेव कमावता होता. अस्लम यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मानसिंगच्या कुटुंबाला आधार दिला. 


ही बातमी देखील वाचा


UPSC क्रॅक करायचीय? तर 'या' तीन गोष्टी अत्यावश्यक; पुणे, दिल्लीला न जाता गावात राहून परीक्षा पास झालेल्या IPS अजिंक्य मानेंचा मूलमंत्र


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI