नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार, नव्या सरकारच्या स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित
नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे.
नवी दिल्ली : नितीशकुमार (Nitish Kumar) पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील. तर मंत्रिमंडळात जुन्या फॉर्म्युल्यानुसार मंत्र्यांची संख्या निश्चित केली जाईल. तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी लालू यादव कॅम्प देखील सक्रिय झाला आहे.
नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. नितीश कुमार यांच्या एनडीएमधील समावेशाच्या चर्चांनंतर लालू यादव कॅम्प अॅक्टिव्ह झाला आहे. नितीश कुमार वगळता आघाडीचे 114 आमदार आहे तर बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे. एमआयएमचे एकमेव आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान, अपक्ष आमदार सुमित सिंह यांच्यासह जेडीयूमधील नाराजांशीही संपर्क केला जाऊ शकतो.
बिहारच्या राजकारणात लवकरच मोठा बदल
सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांच्याबाबत भाजपच्या जेष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात नितीश कुमार यांच्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात लवकरच मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
#WATCH | Haridwar: On the politics going on in Bihar, Yoga Guru Swami Ramdev says, "Nitish Kumar is also joining the flow. His political future will be safe. For political stability in the country, all nationalist leaders and parties who stand together in giving prominence to… pic.twitter.com/SyaH6h69fa
— ANI (@ANI) January 26, 2024
राजकारणात मात्र तर्कवितर्कांना उधाण
याच चर्चांवरुन राजकारणात मात्र तर्कवितर्कांना उधाण आलंय राजकारणात चर्चांना ऊत आलाय. तर बिहारमध्ये घडामोडींना वेग आला आहे. बिहारचे भाजप अध्यक्ष सम्राट चौधरींनी प्रदेश प्रभारी विनोद तावडेंची भेट घेतली आहे.त्यानंतर ते अमित शाह आणि जेपी नड्डांचीही भेट घेणार आहे.
इंडिया आघाडीला एकामागोमाग एक दोन धक्के
आगामी लोकसभेसाठी इंडिया आघाडीची घडी बसण्याआधाची विस्कटलीये.अर्थात त्याला कारण ठरतंय ते जागावाटपपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्यांचं स्पष्ट केलंय. त्यानंतर काहीच तासात आपनेही आपली भूमिका स्पष्ट केलीये.आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं. इंडिया आघाडीला एकामागोमाग एक दोन धक्के बसले.
हे ही वाचा :
Nitish kumar : नितीश कुमार पुन्हा एकदा राजकीय कलटी मारण्याच्या तयारीत; इंडिया आघाडीला धक्का देत पुन्हा भाजपला मांडी लावून बसणार?