एक्स्प्लोर

मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यातील राजकारणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोवा काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यामध्ये मध्यरात्री दाखल झाले आहेत. भाजप आणि मित्रपक्षांशी चर्चा करुन मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोव्याचं नेतृत्व कोणाकडे सोपवायचं यासाठीच्या सर्व पर्यायांची चाचपणी नितीन गडकरी करत आहेत.

नितीन गडकरी यांनी काल रात्री गोवा फॉरवर्ड पार्टीच्या विजय सरदेसाई आणि एमजीपीच्या सुधीन ढवळीकर यांच्या आमदारांसोबत जवळपास दोन तास चर्चा केली. आज दिवसभरातील चर्चांनंतर अखेरचा निर्णय घेतला जाणार आहे.

गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सध्या आघाडीवर आहे. सर्व मित्रपक्षही सावंत यांना पाठिंबा देऊ शकतात. श्रीपाद नाईक यांचंही नाव चर्चेत होतं, मात्र भाजपच्या मित्रपक्षांचा नाईक यांना विरोध आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनीही आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं आहे. आम्ही मनोहर पर्रिकर यांना समर्थन दिलं होतं, भाजपला नाही. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर भाजप आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असं देखील सरदेसाई यांनी म्हटलं. मात्र राज्यात आम्हाला निवडणुका नको आहेत, आम्हाला स्थिर सरकार अपेक्षित आहे, हे देखील विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवार, 18 मार्च रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. -  सकाळी 9.30 ते 10.30 - मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी येथील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल. - सकाळी 10.30 वाजता पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी येथे हलविले जाईल. - 11 ते 4 वाजेपर्यंत : सामान्य लोकासांठी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. - दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कारासाठी मीरामार येथे पर्रिकर यांचे पार्थिव हलविले जाईल. - 4.30 वाजता : अंतिम विधी सुरु होईल. - सायंकाळी 5 वाजता पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील. संबंधित बातम्या लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय   'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget