Nitin Gadkari : आगामी  पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (Economy) बनण्यासाठी वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं. भारत जगातील एक अव्वल वाहन निर्मिती केंद्र बनावं. यासाठी पुढील 5 वर्षांत वाहन निर्मिती उद्योग  7.5 लाख कोटींवरुन 15 लाख कोटींपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच रस्ते अपघातांच्या (Road Accident) बाबतीत गंभीर आणि संवेदनशील दृष्टीकोन आवश्यक आहे. लोकांचे बहुमोल जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले. बंगळुरु इथे आयोजित करण्यात आलेल्या परिवहन विकास परिषदेच्या 41 व्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. 


डिझेल बसेसच्या जागी  इलेक्ट्रिक बसचा वापर करायला हवा


प्रदूषण आणि खर्च कमी करण्यासाठी सर्व डिझेल बसेसच्या जागी  इलेक्ट्रिक बसचा वापर करायला हवा असेही गडकरी यावेळी म्हणाले. सर्व संबंधितांनी पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करायला हवा. रस्ते अपघातांच्या बाबतीत गंभीर आणि संवेदनशील दृष्टीकोन आवश्यक असून, लोकांचे बहुमोल जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही गडकरी म्हणाले. 


परिवहन विकास परिषदेत विविध राज्याचे परिवहन मंत्री सहभागी 


41 व्या परिवहन विकास परिषदेत  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, कर्नाटक, दिल्ली आणि तामिळनाडू मधील परिवहन मंत्री सहभागी झाले होते. रस्ते बांधणी, सार्वजनिक वाहतूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, रस्ते सुरक्षा आणि रस्ते वाहतूक विकासाबाबत मंत्रालयाने हाती घेतलेल्या  उपक्रमांचे त्यांनी  कौतुक केले. मोटार  वाहन (सुधारणा) कायदा, 2019 आणल्याबद्दल आणि त्याची जलद अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी गडकरींची प्रशंसा केली. दरम्यान, पुढच्या पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करणे गरडेचे असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. रस्ते वाहतूक, रस्ते सुरक्षा आणि सहाय्यक वाहतूक पायाभूत सुविधांचा दर्जा  सुधारण्यासाठी  संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दलही त्यांनी माहिती दिली. 


महत्त्वाच्या बातम्या: