एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निर्भया प्रकरण : तिहार जेल प्रशासनाकडून नवीन डेथ वॉरंटसाठी कोर्टात अर्ज
निर्भया प्रकरणात तिहार जेल प्रशासनाने चारी दोषींवर नवीन डेथ वॉरंटसाठी दिल्ली हायकोर्टात अर्ज केला आहे. 31 जानेवारीला कोर्टाने फाशीच्या शिक्षेला अनिश्चित काळासाठी स्थगित दिली आहे.
नवी दिल्ली : निर्भया प्रकरणात तिहार जेल प्रशासनाने चारी दोषींवर नवीन डेथ वॉरंट बजावण्याचे कोर्टाला आवाहन केलंय. याबाबत तिहार जेल प्रशासनाने दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टाने शुक्रवारपर्यंत चारही दोषींची उत्तरे मागितली आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी तिहार तुरूंगातील अधिकाऱ्यांनी फाशीचे वॉरंट बजावण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर दोषींकडून उत्तरं मागितली आहे. ही याचिका आज दाखल करण्यात आली आहे.
तिहार जेल प्रशासनाने आपल्या अर्जात म्हटले आहे, की अक्षय, मुकेश आणि विनय यांची दया याचिका राष्ट्रपतींनी आधीच फेटाळली आहे. सध्या कोणत्याही फोरममध्ये कोणत्याही दोषीची याचिका प्रलंबित नाही, त्यामुळे नवीन डेथ वॉरंट जारी करावा. बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अक्षयची दया याचिका फेटाळली.
आतापर्यंत दोनदा डेथ वॉरंट जारी करण्यात आलंय -
दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणातील चार दोषी मुकेश कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय कुमार यांच्या फाशीला 31 जानेवारीला पुढील सुनावण्यापर्यंत स्थगिती दिली. चारही दोषींच्या फाशीसाठी दोन वेळा डेथ वॉरंट बजावले गेले आहे. परंतु, अद्याप शिक्षा झाली नाही. चारही दोषी कायदेशीर पर्याय वापरुन फाशीला विलंब करत आहेत.
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला पटियाला हाऊस कोर्टाची स्थगिती, उद्याची फाशी टळली
या प्रकरणातील पहिला डेथ वॉरंट 7 जानेवारीला बजावण्यात आला होता. त्याअंतर्गत निर्भया प्रकरणातील चार दोषींना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येणार होती. यानंतर 17 जानेवारी दुसरे डेथ वॉरंट जारी करण्यात आले. त्याअंतर्गत या चारही दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. परंतु, 31 जानेवारीला कोर्टाने फाशीची शिक्षेला अनिश्चित काळासाठी स्थगित दिली. दुसरीकडे, बुधवारी उच्च न्यायालयाने सांगितले की, चारही दोषींना स्वतंत्रपणे नव्हे तर सोबत फाशी देण्यात यावी.
काय होती घटना -
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तिला आणि त्याच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं. नंतर पोलिसांनी निर्भयाला रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. 29 डिसेंबर 2012 रोजी, सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निर्भयाचा मृत्यू झाला. एक सप्टेंबर 2013 रोजी कनिष्ठ कोर्टाने चार दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश आणि अक्षय सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
Nirbhaya Rapist Death Sentence | दिल्ली निर्भया बलात्काराप्रकरणी चारही दोषींना एकत्र फाशी देणार - दिल्ली हायकोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement