एक्स्प्लोर

Nirbhaya Case | दोषी पवनची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली; सर्व दोषींना उद्या फासावर लटकवणार?

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना उद्याच फासावर लटकवण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी दोषी पवनकडून करण्यात आली होती. त्यामुळं या प्रकरणातील चारही आरोपींना उद्याच फाशी दिली जाणार, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. पण राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळं आता पवर दया याचिका करतो का, यावर निर्भयाच्या दोषींची फाशी अवलंबून असणार आहे. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना उद्या फासावर लटकवलं जाण्याची शक्यता आहे. दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीय. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पवन गुप्ताने या क्युरेटिव्ह याचिकेत केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलीय. क्युरेटिव्ह याचिका फेटाळली तरी त्याच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्याला ही दया याचिकाही तीन मार्चपूर्वी अर्थात आजच दाखल करावी लागेल. कायद्यानुसार, दया याचिका दाखल केलेल्या कोणत्याही दोषीला ती फेटाळण्यात येईपर्यंत फासावर चढवता येत नाही. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर 14 दिवसांनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे पवननं दया याचिका दाखल केली तर ती फेटाळून त्याला फासावर चढवण्यासाठी 20 मार्चचा दिवस उजाडू शकतो. त्यामुळे आता निर्भयाच्या चारही दोषींना उद्या फासावर लटकवलं जाणार की फाशीची नवीन तारीख समोर येणार याकडं नजरा लागल्यात. Nirbhaya Case : दोषींची फाशी लांबत असल्यानं निर्भयाच्या आईचा कोर्टातच बांध फुटला चारही दोषींना उद्याच फाशी होण्याची शक्यता -  मुकेश कुमार सिंह(वय 32), पवन गुप्ता(25), विनय कुमार शर्मा(26) आणि अक्षय कुमार(31) अशी या दोषींची नावं आहेत. आपल्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचा दावा दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी केलाय. दोषींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, अक्षयसाठी ते नवी दया याचिका करणार आहेत. तर, पवनकडेही राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. निर्भयाच्या आई-वडिलांनी 11 फेब्रुवारीला दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये 22 जानेवारीला दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा एक फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयानं 31 जानेवारीला एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती. काय होती घटना - दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तिला आणि त्याच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं. नंतर पोलिसांनी निर्भयाला रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. 29 डिसेंबर 2012 रोजी, सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निर्भयाचा मृत्यू झाला. एक सप्टेंबर 2013 रोजी कनिष्ठ कोर्टाने चार दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश आणि अक्षय सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. Nirbhaya Rapist Death Sentence | दिल्ली निर्भया बलात्काराप्रकरणी चारही दोषींना एकत्र फाशी देणार - दिल्ली हायकोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget